Pratibha Chaudhary, a corporator, presenting her position at the Standing Committee meeting in the Municipal Corporation on Thursday.
Pratibha Chaudhary, a corporator, presenting her position at the Standing Committee meeting in the Municipal Corporation on Thursday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : सत्तेत असूनही BJP प्रशासनापुढे हतबल

सकाळ वृत्तसेवा

धुळे : केंद्र, राज्य आणि महापालिकेत सत्ता असूनही भाजपचे नगरसेवक महापालिका प्रशासनापुढे हतबल असल्याचे गंभीर चित्र स्थायी समिती सभेत गुरुवारी (ता. ४) दिसून आले.

वारंवार तेच प्रश्‍न आणि त्यावर मोघम उत्तरे अधिकाऱ्यांकडून दिली जात असल्याने पुढच्या निवडणुकीवेळी कुठल्या तोंडाने मते मागण्यासाठी जावे, असा कळीचा प्रश्‍न उपस्थित करत संबंधित नगरसेवकांनी प्रशासनापुढे हतबलता व्यक्त केली. (Dhule Municipal corporation Standing Committee meeting dhule latest marathi news)

सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आयुक्त देवीदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते. प्रभाग सहाचे नगरसेवक किरण अहिरराव यांनी कार्यक्षेत्रातील शंभर कॉलन्या चिखलात रुतल्याची तक्रार केली.

त्यावर अधिकारी केवळ गुळमुळीत उत्तरे देत वेळ मारून नेतात. शासनाकडून दोनशे- पाचशे कोटींचा निधी येईल तेव्हा येईल, त्याआधी खड्डे, नादुरुस्त झालेल्या रस्त्यांवर मुरुम तरी टाका, कॉलन्यांमध्ये दिवे लावा, अशी मागणी श्री. अहिरराव यांनी केली. अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे पुढील निवडणुकीस उभे रहायला नाक राहिलेले नाही, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला.

१२२ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

या पार्श्वभूमीवर अभियंता कैलास शिंदे म्हणाले, की कॉलनी विकासाबाबत नव्याने १२२ कोटींच्या निधी मागणीचा प्रस्ताव तयार केला आहे. अंदाजपत्रकात मुरुमासाठी तरतूद नाही. आयुक्तांनीही याप्रश्‍नी निधीची तरतूद करावी लागेल.

बांधकाम विभागाकडून प्रस्ताव व निविदा प्रक्रिया राबवावी लागेल, असे उत्तर दिल्यानंतर नगरसेवक अहिरराव यांनी संतप्त भावना व्यक्त केली. याचा अर्थ काहीच कार्यवाही होणार नाही, असे ते उद्विग्नतेने म्हणाले. अधिकाऱ्यांनी कॉलन्यांमध्ये फेरफटका मारावा, तेव्हा त्यांना वस्तुस्थिती कळेल, असे नगरसेवक अहिरराव यांनी म्हटल्यानंतर सभापती नवले यांनी धोरण निश्चितीतून हा प्रश्न मार्गी लावू, असे सांगितले.

मनपा प्रशासनाचा धिक्कार

नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनीही अधिकाऱ्यांवर आगपाखड केली. आयुक्त फक्त ऐकण्याच्या भूमिकेत दिसतात. समस्या निवारणासंदर्भात ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. अशा अकार्यक्षम प्रशासनाचा मी धिक्कार करते, अशा शब्दात संताप व्यक्त केल्यानंतर सत्ताधारी काही सदस्यांनी बाक वाजवून नगरसेविका चौधरी यांना पाठिंबा दर्शविला.

शिवाय नगरसेविका चौधरी यांनी दूषित पाणीपुरवठ्याबाबत पूर्वी तक्रार केल्याची आठवण करून दिली. या जनहिताच्या प्रश्‍नावर प्रशासन कुठलीही अंमलबजावणी करीत नसल्याने नगरसेविका चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली.

नकाणे रोड, मोचीवाडा ते इंदिरा गार्डनपर्यंतच्या मार्गावरील खड्डे तात्पुरते बुजवावेत, अशी मागणी त्यांनी केली. पुढील निवडणुकीत कुठल्या तोंडाने जनतेसमोर जायचे, असे त्याही उद्विग्नतेने म्हणाल्या. त्यावर खड्डे बुजविण्याचे काम जीवन प्राधिकरणाचे असून, या यंत्रणेला योग्य ती सूचना दिल्याचे आयुक्तांसह सभापतींनी सांगितले.

रेलन, बोरसे यांची तक्रार

नगरसेवक हर्षकुमार रेलन म्हणाले, की स्थायीच्या सभेत तेच ते विषय किती वेळा मांडावे, त्यावर प्रशासनाकडून काही अंमलबजावणीच होत नसल्याने आमचे जनतेत हसू होताना दिसते. नगरसेवक निधीची फाईल २०१८ पासून लालफितीत अडकल्याची जाणीव त्यांनी करून दिली.

नगरसेवक नागसेन बोरसे यांनी प्रभाग सातमध्ये पांझरा नदीकाठी असलेली महापालिकेची तीन एकरपैकी दोन एकर जागा अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केल्याची तक्रार केली. सभापती नवले यांनी अतिक्रमणधारकांना तीन दिवसांत हटवावे, अशी सूचना अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिली.

मोकाट कुत्र्यांचा प्रश्‍न कायम

नगरसेविका किरण कुलेवार यांनी मोकाट कुत्रे, डेंग्यू व मलेरिया रोखण्यासाठी अ‍ॅबेटींग, फवारणीबाबत प्रश्‍न मांडले. या समस्यांच्या निवारणाची मागणी केली. निर्बिजीकरणातून मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सुटणार नाही. याबाबत ठेक्यात गैरप्रकार होतात. त्यामुळे हा विषय स्थगित ठेवण्याची त्यांनी मागणी केली. तसा निर्णय सभापतींनी जाहीर केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT