Dhule municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : थकबाकीदार 108 गाळेधारकांना अखेरची नोटीस, जप्तीचा इशारा

Dhule Municipality News : जिल्हा क्रीडासंकुल व गरुड मैदान येथील सुमारे १८० थकबाकीदार गाळेधारकांना अंतिम नोटीस बजावली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipality News : जिल्हा क्रीडासंकुल व गरुड मैदान येथील सुमारे १८० थकबाकीदार गाळेधारकांना अंतिम नोटीस बजावली आहे. लवकरात लवकर भाडे भरले नाही तर गाळा सील करण्याचे नोटिशीत नमूद केले आहे. भाडेपट्टा करारनामा न करणाऱ्या गाळेधारकांचे गाळे जप्त करण्याचा इशाराही दिला आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयांतर्गत येणाऱ्या शहरातील गरुड मैदान व देवपुरातील जिल्हा क्रीडासंकुलातील व्यापारी संकुलातील बहुतांश गाळेधारकांनी मासिक भाडे भरलेले नाही. (Dhule Municipality Final notice confiscation warning to 108 defaulters)

त्यामुळे थकबाकीची रक्कम वाढली आहे. शिवाय काहींनी अनामत रक्कमही भरलेली नसल्याने थकबाकीची रक्कम सुमारे ५० लाखांपर्यंत पोचली आहे. वारंवार नोटीस बजावूनही गाळेधारकांकडून प्रतिसाद मिळत नाही. आता या गाळेधारकांना अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. ज्या गाळेधारकांनी भाडेपट्टा करारनामा केला नाही.

अशा गाळेधारकांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. संबंधित गाळेधारकांना नोटिशीद्वारे ३१ मार्च २०२४ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. (latest marathi news)

त्यातील काही जणांनी पैसे भरले आहेत. मात्र, बहुतांश गाळेधारकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. मुदतीत जे गाळेधारक मासिक भाडे व अनामत रक्कम भरणार नाहीत तसेच भाडेपट्टा करारनामा करनामा करणार नाहीत.

त्यांचे गाळे जिल्हा क्रीडासंकुल समितीमार्फत जप्त करण्यात येतील, असा इशारा नोटिशीद्वारे देण्यात आला आहे. लवकरात लवकर भाडे भरले नाही तर गाळे सील केले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT