Ekvira Devi Dhule esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Navratri: धुळ्यात 50 हजारांवर भाविकांकडून खानदेश कुलस्वामिनी एकवीरादेवीचे दर्शन; नवरात्रोत्सवात 90 तोळे सोन्याचे दागिने चढविणार

Latest Navratri 2024 News : श्री एकवीरादेवी मंदिरात गुरुवारी सकाळी घटस्थापना झाली. श्री एकवीरादेवी खानदेशची कुलस्वामिनी आहे. मंदिरात नऊ दिवस नवरात्रोत्सव होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : नवरात्रोत्सवाला गुरुवार (ता. ३)पासून सुरुवात झाली. शहरातील खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिरात पहिल्या माळेला ५० हजारांवर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी दिली. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Over 50 thousand devotees visit Khandesh Ekvira Devi)

श्री एकवीरादेवी मंदिरात गुरुवारी सकाळी घटस्थापना झाली. श्री एकवीरादेवी खानदेशची कुलस्वामिनी आहे. मंदिरात नऊ दिवस नवरात्रोत्सव होणार आहे. यंदा देवीला ९० तोळे सोन्याचे दागिने चढविले जाणार आहेत. यात न्यायालयाकडून मिळविलेल्या ३० तोळे दागिन्यांचाही समावेश आहे.

विश्व कल्याणासाठी ९ ते ११ ऑक्टोबरदरम्यान शतचंडी याग होमहवन होईल. ७ ऑक्टोबरला सकाळी दहाला १०१ कुमारिका पूजन, ११ व १२ ऑक्टोबरला होमहवन, शतचंडी, यज्ञ पुर्णाहूती होईल. १२ ऑक्टोबरला महानवमी सुवासिनी पूजन होईल.

१२ ऑक्टोबरला दसरा उत्सव होईल. नवरात्रोत्सवात खानदेश कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी विश्वस्त मंडळाने मंदिर २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. (latest marathi news)

पोलिसांचा बंदोबस्त

शहरासह जिल्ह्यात २७५ ठिकाणी घट आणि देवीच्या मूर्तीची स्थापना झाली. तसेच लहान व मोठ्या १६ मंदिरांतही देवीचा जागर होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अडीच हजार कर्मचारी बंदोबस्त तैनात आहे. यात पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन उपअधीक्षक, १२ पोलिस निरीक्षक, ५९ सहाय्यक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांसह ७६ अधिकारी, तर एक हजार २३४ कर्मचारी, ८०० पुरुष व १५० महिला होमगार्ड, सुमारे ९० जवानांची एसआरपी तुकडी, शीघ्रकृती दलाचे तुकडीसह सुमारे दोन हजार ५०० कर्मचारी तैनात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT