JCB machine while demolishing encroachment in bus stand area. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : दुसाणे बसस्थानक परिसरातील अतिक्रमण जमीनदोस्त; 60 वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न निकाली

Dhule News : गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न असलेला बसस्थानक परिसरातील अतिक्रमण साक्री येथील उपविभागीय कार्यकारी अभियंता विनोद वाघ यांच्या नेतृत्वखाली नुकतेच काढण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित प्रश्न असलेला बसस्थानक परिसरातील अतिक्रमण साक्री येथील उपविभागीय कार्यकारी अभियंता विनोद वाघ यांच्या नेतृत्वखाली नुकतेच काढण्यात आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा परिसर मोकळा श्वास घेत आहे. गावातील ग्रामस्थांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. (Dhule Encroachment land demolition in Dusane bus stand area)

विहीरगाव ते सुकवद रस्त्याचे काम दोन वर्षांपासून सुरू होते. यामध्ये दुसाणे ते विहीरगाव फाटा हे सात किलोमीटर रस्त्याचे काम अत्यंत जलदगतीने सुरू होते; परंतु दुसाणे बसस्थानक परिसरातील अतिक्रमण खूप प्रमाणात वाढले होते.

दोन वाहनेसुद्धा जाऊ शकत नव्हती, तसेच याच परिसरातच, प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद शाळा आहेत. साधारणपणे एक हजार ५०० च्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेतात. गावातून शाळेत येण्यासाठी हाच एकमेव रस्ता होता.

गेल्या वर्षभरापासून शासकीय नियमानुसार संबंधित व्यापाऱ्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या; परंतु अतिक्रमण काढत नव्हते. शेवटी साक्री येथील बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी विनोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील २५ ते ३० मीटर रस्त्याचे अतिक्रमण जेसीबीने काढण्यात आले.

हे अतिक्रमण सिटी सर्व्हेच्या नकाशाप्रमाणे काढण्यात आले. अधिकारी विनोद वाघ, राकेश पाटील, दीपक फड, हर्शल पाटील, मनोज कुवर, भोई, देशपांडे, तसेच निजामपूर पोलिस ठाण्याचे एपीआय गायकवाड व त्यांच्यासोबत २५ ते ३० पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळीने अतिक्रमण काढण्यासाठी सहकार्य केले. कोणत्याही प्रकारची हुज्जत अधिकाऱ्यांशी कोणी घातली नाही. परिसरात रस्त्याच्या दोनही बाजूला मोठी गटार येणार आहे व रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यामुळे दुसाणेच्या गावप्रवेशाची शान वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

SCROLL FOR NEXT