डॉ. देशबंधू प्यारेलाल गुप्ता
डॉ. देशबंधू प्यारेलाल गुप्ता 
उत्तर महाराष्ट्र

सेवाव्रती उद्योजक देशबंधू गुप्ता यांचे मुंबईत निधन

सकाळवृत्तसेवा

धुळे: औषध निर्मिती क्षेत्रातील जगविख्यात लुपीन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष व सेवाव्रती डॉ. देशबंधू प्यारेलाल गुप्ता (वय 80) यांचे जुहू (मुंबई) येथील निवासस्थानी रविवारी (ता. 25) पहाटे दोनला निधन झाले. ते शुक्रवारी नियमितपणे कामकाज व्यस्त होते. त्यांचे ह्रदयविकाराने निधन झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

लुपीन कंपनीचे देशात 12, तर विदेशात 8 ठिकाणी प्रकल्प आहेत. सर्व प्रकारची औषधे तयार करताना क्षयरोगासंबंधी औषध निर्मितीत ही कंपनी विश्‍वात पहिल्या क्रमांकाची ठरल्याचे मानली जाते. हजारो हातांना काम देणाऱ्या या कंपनीची वार्षिक उलाढाल सुमारे 48 हजार कोटी रुपये आहे. राजगड (जि. अल्वर, राजस्थान) येथील देशबंधू गुप्ता यांनी पीएच. डी. पदवी प्राप्त केल्यानंतर राजस्थानमधील बिट आयआयटीमध्ये अध्यापनास सुरवात केली. त्यांचा ओढा व्यवसायाकडे असल्याने त्यांनी औषध निर्मिती क्षेत्रात पाय रोवले. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी लुपीन फाउंडेशन, देशबंधू ऍण्ड मंजू गुप्ता फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थांव्दारे परिवर्तनासह ग्रामीण विकासासाठी "चेंज इंडिया प्रोग्रॅम' हाती घेत देशबंधू गुप्ता यांनी देशात नऊ राज्यातील साडेतीन हजार, तर महाराष्ट्रात सरासरी पंधराशेहून अधिक गावे दत्तक घेतली आहेत. यात धुळे जिल्ह्यातील सहाशे गावांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे देशबंधू गुप्ता यांनी व्यक्तिगत उत्पन्नातून धुळे जिल्ह्यात सिंचन, शिक्षण, आरोग्य, रोजगार, कौशल्यविकास, पशुसंवर्धन, महिला सक्षमीकरण यासह विकासाच्या विविध क्षेत्रातील दारिद्ररेषेखालील घटकांच्या उन्नतीसाठी भरीव निधी दिला. त्यातून या जिल्ह्यात परिवर्तनही घडू लागले आहे. दत्तक गावांमध्ये आर्थिक, सामाजिक प्रगतीसाठी मोठे कार्य उभे केले जात आहे. देशप्रेमामुळेच त्यांचे नाव आईवडिलांनी देशबंधू, तर दुसऱ्या मुलाचे नाव विश्‍वबंधू ठेवले. देशबंधू गुप्ता यांचा मुलगा नीलेश हे लुपीन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, तर कन्या विनिता या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. देशबंधू गुप्ता यांच्यावर जुहू येथे मंगळवारी सकाळी दहाला अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या निधनामुळे उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात शोकप्रकट झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT