Dhule News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : समस्यांमुळे यंत्रणा रोजच खाते धुळेकरांचे ‘शिव्याशाप'

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेसह इतर विविध मूलभूत सोयी-सुविधांच्या प्रश्‍नांवर वर्षानुवर्षे झगडणाऱ्या धुळेकरांच्या पदरी निराशा कायम आहे. महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांसह इतर लोकप्रतिनिधींकडून कोट्यवधी रुपयांच्या कामाचा गाजावाजा होत असला तरी समस्या सुटायला तयार नाहीत.

रस्त्यांच्या दुरवस्थेप्रश्‍नी तर ज्या-ज्या अशा रस्त्यांवरून नागरिक जातात, त्या-त्या वेळी संबंधित यंत्रणांना ते शिव्याशाप देतात. त्यामुळे नागरिकांना दररोज भोगावा लागणारा त्रास कोण थांबविणार अन् त्यांचे आशीर्वाद कोण घेणार याचीच प्रतीक्षा आहे.

धुळे शहरातील रस्त्यांचा दुरवस्थेचा प्रश्‍न थांबता थांबेना अशी स्थिती आहे. देवपूर भागातील रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाल्याचा गाजावाजा झाला असला तरी या भागातील इतर अनेक रस्त्यांची दैना आजही वाईटच आहे. त्यामुळे केवळ निधी मंजूर होऊन उपयोग नाही तर त्यातून किती वेगाने, तत्परतेने रस्ते तयार होतात व नागरिकांना दिलासा मिळतो हेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

कारण एक रस्ता तयार झाल्यानंतर तो मुदतीत होत नाही. परिणामी तोपर्यंत दुसऱ्या एखाद्या रस्त्याची ‘वाट’ लागलेली असते. आजघडीला शहरातील सावरकर पुतळा ते अंडाकृती बगीचा, नकाणे रोड ते शारदा नेत्रालय व पुढे पाटीलनगरपर्यंत, जयहिंद इंग्लिश स्कूलचा परिसर, कुमारनगर पूल, सामाजिक न्याय भवनसमोरील रस्ता, महात्मा गांधी चौक, फाशीपूल, पोलिस मुख्यालयासमोरचा मॉडेल रस्ता अशा कितीतरी रस्त्यांची दैना कधी संपेल याची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

इतर समस्याही ‘जैसे थे’

विविध भागांतील जलवाहिन्यांच्या गळत्यांची एक वेगळी समस्या आहे. त्यामुळे त्या-त्या भागातील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. शिवाय दूषित पाणीपुरवठ्याचा धोका असतो. या गळत्यांमुळे ठिकठिकाणी खड्डे, डबके कायम असतात. मोकाट गुरांचा प्रश्‍नही वर्षानुवर्षांपासून सुटलेला नाही.

महापालिकेकडून बाजारपेठ व इतर काही महत्त्वाच्या ठिकाणी तेवढी साफसफाई, कचरा उचलण्याचे काम होते. इतरत्र यावर काम दिसत नाही. अनेक ठिकाणचे पथदीप आजही बंद आहेत. साधे पथदीपांचा प्रश्‍न सुटत नसल्याने काही नगरसेवकांनी थेट राजीनामा देण्यापर्यंत भावना व्यक्त केल्याचेही त्यामुळे पाहायला मिळाले आहे. याच स्थितीमुळे वकिलांनी कायदेशीर लढाईचे हत्यार उपसले आहे.

...तिथे इतरांची काय बिशाद!

ज्या कार्यालयातून संपूर्ण जिल्ह्याचा कारभार चालतो, यंत्रणा हलते, जेथे दररोज शेकडो नागरिक, अधिकारी, लोकप्रतिनिधींचे येणे-जाणे असते त्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा, ज्या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याची ग्रामीण यंत्रणा हलविली जाते त्या जिल्हा परिषदेसमोरच्या रस्त्याचीदेखील दैना आहे. त्यामुळे इतरांची काय बिशाद, असा प्रश्‍न पडतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: श्रेयस अय्यरला डावलून शुभमन गिलला संधी; मांजरेकर बसरले, 'हा अन्याय आहे...'

Viral: पतीने गर्भनिरोधक गोळी खरेदी केली, ऑनलाइन पैसे दिले, पण एक छोटी चूक अन् पत्नीसमोर अनैतिक संबंधाचे बिंग फुटले!

Latest Marathi News Updates : ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Shirur Crime : मेडिकल चालकाची डॉक्टरला शिवीगाळ करीत पट्ट्याने मारहाण; डॉक्टर जखमी

SCROLL FOR NEXT