corona update  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : Coronaचा संभाव्य धोका लक्षात घेता सज्ज राहा : महापौरांचे अधिकाऱ्यांना आदेश

सकाळ वृत्तसेवा

धुळे : चीनसह जगातील इतर देशांमध्ये पुन्हा कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेता उपाययोजनांसाठी यंत्रणेने सज्ज राहावे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कार्यवाही सुरू करावी असा आदेश महापौर प्रदीप कर्पे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान, सद्यःस्थितीत आपल्याकडे संसर्गाची परिस्थिती नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये मात्र संभाव्य धोका टाळण्यासाठी लसीकरण करून घ्यावे, मास्कचा वापर करावा, गर्दीत जाणे टाळावे असे आवाहनही श्री. कर्पे यांनी केले.

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला आहे. इतर देशातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात केंद्र, राज्य शासनाकडून खबरदारीचे आवाहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर धुळे शहराच्या अनुषंगाने महापौर श्री. कर्पे यांनी शुक्रवारी (ता.२३) महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

उपमहापौर नागसेन बोरसे, महिला बालकल्याण समिती उपसभापती आरती पवार, आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त विजय सनेर, आरोग्याधिकारी डॉ. एम. आर. शेख, डॉ. जे. सी. पाटील, डॉ. संपदा कुलकर्णी, डॉ. योगेश पाटील, सर्व वैद्यकीय अधिकारी, अभियंता कैलास शिंदे आदी उपस्थित होते.

कोरोना तपासणी केंद्र कार्यान्वित करणे, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता, लसीचा साठा, अत्यावश्यकप्रसंगी विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था, आवश्यक वैद्यकीय साहित्य याबाबत महापौर श्री. कर्पे यांनी माहिती घेतली. प्रसंगानुरूप व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाहीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, संभाव्य धोका लक्षात घेता सर्व वैद्यकीय यंत्रणेने सुसज्ज राहावे, सूक्ष्म नियोजन व कृती आराखडा तयार करावा असा आदेश महापौर श्री. कर्पे यांनी अधिकाऱ्यांना दिला.

लसीकरणासाठी जनजागृती

शहरात ज्या नागरिकांचे कोविड लसीकरण झालेले नाही, ज्या नागरिकांनी बूस्टर डोस घेतलेला नाही अशा नागरिकांचे तातडीने लसीकरण करण्याबाबत कार्यवाही करण्याचे बैठकीत निश्‍चित झाले. यासाठी नगरसेवक, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती व प्रबोधन करण्याचे व त्यासाठी सर्व नगरसेवकांची बैठक घेण्याचे बैठकीत ठरले.

नागरिकांना आवाहन

सद्यःस्थितीत भारतात कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, संभाव्य धोका टाळण्यासाठी मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सुरक्षित अंतर ठेवावे, वारंवार धुवावेत तसेच, लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापौर श्री. कर्पे यांनी केले. बैठकीला आरोग्य विभागाचे कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र माईणकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, लक्ष्मण पाटील व इतर संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT