Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti esakal
उत्तर महाराष्ट्र

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांपुढे सर्वच नतमस्तक; जयंती उत्सव जल्लोषात

Shiv Jayanti : रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात सोमवारी (ता. १९) विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात सोमवारी (ता. १९) विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम झाले. छत्रपती शिवरायांची प्रतिमा, पुतळ्यासमोर आबालवृद्धांसह शिवप्रेमी नतमस्तक झाले.

जल्लोषात झालेल्या या जयंती उत्सवात भाजीपाला विक्रेता संघटनेकडून छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट व महाभिषेक, विश्‍व हिंदू परिषद आणि एसएसव्हीपीएस संस्थेतर्फे सजीव देखाव्यांच्या रॅलीने धुळेकरांचे लक्ष वेधले. शहरात ठिकठिकाणी रात्री आठनंतर जल्लोषात कार्यक्रम, मिरवणुका सुरूच होत्या. (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)

धुळे शहरात रयतेचे राजा छत्रपती शिवरायांना चौकाचौकांत अभिवादन झाले. सकाळपासूनच चौकाचौकांत पोवाडे, शिवगीतांचा गजर सुरू झाला. तरुणाई दुचाकीवरून भगवे ध्वज, भगवी टोपी परिधान करीत छत्रपती शिवरायांचा जयघोष करताना दिसली. अनेक मंडळांनी दुचाकी रॅली काढली.

शिवरायांच्या जयंतीनिमित्त सोमवारची पहाट शिवतेजामुळे भगवामय झालेली दिसली. शहर भगवामय झाले होते. शिवरायांचे स्मारक आकर्षक रोषणाईत न्हाऊन निघत होते. पक्ष-संघटना, मंडळांकडून आकर्षक देखावे, सजीव देखावे, तर रांगोळ्यांनी परिसर सजविण्यात आला होता. सजीव देखाव्यांमुळे शहरात शिवशाही अवतरल्याचा भास होत होता.

एसएसव्हीपीएस संस्था

श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेतर्फे शहरातून शोभायात्रा निघाली. एसएसव्हीपीएस महाविद्यालयातून रॅलीला सुरवात झाली. संस्थेच्या विविध शाखांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक सहभागी झाले. लेझीम पथक, विविध चित्ररथांचा सहभाग राहिला.

शिवकालीन प्रसंगाचे सजीव देखाव्यातून सादरीकरण झाले. नेहरू चौकात या रॅलीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार, शहर-जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी व कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी केली.

विश्‍व हिंदू परिषद

विश्व हिंदू परिषदेच्या धुळे शाखेने शिव जयंती रॅलीतील सजीव देखाव्याने धुळेकर भारावले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत असल्याने व याच वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याला दिलेली राजमुद्रा भारतीय नौदलाच्या ध्वजावर स्थापित झाल्याने विश्‍व हिंदू परिषदेने शिवजन्मोत्सव साजरा करण्याचे ठरविले.

आक्रमणांपासून शिवाजी महाराजांचा जन्म, स्वराज्याची शपथ, धाडसी लढाया ते स्वराज्याची स्थापना, असा चित्तथरारक वैभवशाली इतिहास आकर्षक सजीव देखाव्यातून मांडण्यात आला. ॲड. गिरिधर गुजराथी, ज्येष्ठ स्वयंसेवक नानाभाऊ जोशी.

साहेबचंद जैन, क्रीडा भारतीचे भिकन बारसे, कीर्तनकार नाना महाराज, प्रांत कार्यकर्ते भरत देवळे, महानगरमंत्री उमेश चौधरी, विनोद सोमाणी, महेंद्र विसपुते, लोकेश चौधरी, सचिन मराठे, अमित खोपडे, संतोष चौधरी, अमोल भागवत, विनायक बडगुजर, राकेश संचेती आदी उपस्थित होते. अनेक धुळेकरांना सेल्फी घेण्याचा मोह आवरला जात नव्हता.

मराठा महासंघ

जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शिवरायांच्या पुतळ्याला पंचामृताने स्वराज्य अभिषेक, पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला. महासंघाचे जगन ताकटे, महिला जिल्हाध्यक्ष उर्मिला पाटील, युवक जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह काळे.

साहेबराव पाटील, मदन वाणी, वैभव पाटील, बाजीराव खैरनार, राजेंद्र मराठे, उमेश पवार, प्रवीण जीवरक, हरिश्चंद्र मिसाळ, राजन बागल, संजय नेतकर उपस्थित होते.

एकशे एक जोडप्यांतर्फे महाभिषेक

शहरातील बाँबे लॉज चौक आणि आग्रा रोडवरील भाजीपाला विक्रेते संघटनेतर्फे एकशे एक जोडप्यांच्या हस्ते छत्रपत्री शिवाजी महाराजांची मूर्ती भेट व महाभिषेक करण्यात आला. आबा भडागे, प्रमोद चौधरी, संजय जगताप, सुनील माळी, महादू परदेशी, पप्पू महाले, सागर वाघ आदींनी आयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताच्या पहिल्या राष्ट्रीय शोकांतिकेवर आधारित भयपटात अहान शेट्टी मुख्य भूमिकेत !

OBC Reservation: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! आता ‘ओबीसीं’साठीही स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना

Latest Maharashtra News Updates : ओबीसी आंदोलकांनी शांतता पाळावी- छगन भुजबळ

Dhule News : विनापरवाना खतविक्री करणाऱ्यावर धुळ्यात कारवाई; शेतकरी आणि शासनाची फसवणूक

Jalgaon News : जळगाव लवकरच महाराष्ट्राची 'ऊर्जा राजधानी'; जिल्हा प्रशासनाचा दावा

SCROLL FOR NEXT