Panchmukhi Pindi in Mahadev Temple.
Panchmukhi Pindi in Mahadev Temple. esakal
उत्तर महाराष्ट्र

Maha Shivratri 2024 : महाशिवरात्रीनिमित्त न्याहळोदला यात्रोत्सव

सकाळ वृत्तसेवा

Maha Shivratri 2024 : येथे सुमारे पाचशे वर्षांपूर्वीच्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव होत असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी मंदिराला रंगरंगोटी व मंदिराला रोषणाईने सजविण्यात येते. महाशिवरात्रीला पहाटे रुद्राभिषेक, महाआरती व प्रसादवाटप कार्यक्रम होईल. (Dhule Nyahlodala Yatrotsav on occasion of Mahashivratri)

तसेच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त जय्यत तयारी सुरू आहे. येथील महादेव मंदिर पुरातन काळातील मंदिर असून, महादेवाच्या पिंडीचे खास वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात कोठेही अशा प्रकारची पिंडी आढळून येत नाही.

पांझरा नदीपात्रात ब्राह्मण अंघोळ करत असताना महादेवाच्या पिंडीचा स्पर्श लागल्याने तिला कोरून तिचा नदीपात्राजवळच अहिल्याबाई होळकर यांच्या कालखंडात जीर्णोद्धार करण्यात आला, असे सांगण्यात येते. महादेवाच्या पिंडीला पाच तोंडे असल्यामुळे पंचमुखी महादेव पिंडी असे संबोधण्यात येते. (latest marathi news)

मंदिराची रचना व वरती काढलेला घुमट उठावदार व शोभनीय आहे. पंचमुखी महादेव पिंडी असल्याने मोठ्या श्रद्धेने भाविक येतात. महादेव मंदिर जागृत देवस्थान आहे. येथे दूरदूरचे भाविक नतमस्तक होतात. यात्रेच्या दिवशी विविध कार्यक्रम होणार आहेत. एकतारी मित्रमंडळातर्फे भजन, गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारीज विश्व विद्यालय, माउंट आबू येथून पूनम बेन, संगीताबेन, प्रमोदभाई, विजयभाई यांच्यामार्फत गीता संदेश प्रवचन होणार आहे. तसेच रात्री नऊ ते अकरा सुदाम महाराज निंबायतीकर यांचे कीर्तन होणार आहे. महादेव मंदिर परिसरात पाळणे, पालखी दाखल झाले असून, यात्रोत्सवासाठी लहान मुलांची खेळणी तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT