On the occasion of Shree Ekvira Devi Jatrotsav, the crowd gathered on the bank of Panjra river on Sunday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Ekvira Devi Yatrotsav : एकवीरादेवी यात्रेनिमित्त उलाढालीची पर्वणी

Dhule News : खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवीच्या यात्रेनिमित्त पांझरा नदीकिनारी रविवारी (ता. २८) सायंकाळनंतर गर्दी उसळली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवीच्या यात्रेनिमित्त पांझरा नदीकिनारी रविवारी (ता. २८) सायंकाळनंतर गर्दी उसळली. त्यामुळे व्यावसायिकांची चांगली उलाढाल झाली. मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. ‘आदिशक्ती एकवीरा माता की जय...’च्या जयघोषाने मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण झाले. (On occasion of Ekvira Devi Yatra Panjra river bank was crowded)

यात्रेनिमित्त पांझरा नदीकिनारी मनोरंजनाच्या साधनांसह खाद्य, गृहोपयोगी साहित्य विक्रेत्यांनी पर्वणी साधली आहे. श्री एकवीरा देवीचा यात्रोत्सव ६ मेपर्यंत चालणार आहे. धुळे, नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यासह मध्य प्रदेश आणि गुजरातमधील भाविक या यात्रोत्सवासाठी दाखल झालेले आहेत.

श्री एकवीरादेवी

खानदेशची कुलस्वामिनी आणि महाराष्ट्रातील पाचवे शक्तिपीठ म्हणून धुळे शहरातील श्री एकवीरादेवी मंदिराची ओळख आहे. देवपूरमध्ये पांझरा नदीकिनारी असलेले श्री एकवीरा देवी आणि रेणुकामाता मंदिर पूर्वापार गुरव घराण्याच्या वहिवाटीत होते. सुमारे चारशे वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर यांनी केला.

मंदिर हेमाडपंती व प्राचीन असून, पूर्वाभिमुखी आहे. एकवीरा व रेणुकामाता आदिशक्ती श्री पार्वतीची रूपे मानली जातात. त्यांनी वेगवेगळे अवतार घेत असुरीशक्तीचा नाश केला. रेणुकामातेचा पुत्र परशुराम यांच्या नावावरून भगवती एकवीरादेवी म्हटले जाते.

शेंदूरलेपणाची मूर्ती

मंदिराच्या दर्शनी भागावर दीपस्तंभ आहे. मूर्ती स्वयंभू, अष्टभुजा, शेंदूरलेपण असून, पद्मासनी आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूला गणपती, तर डाव्या बाजूला तुकाईमातेची चतुर्भुज शेंदूरलेपणाची मूर्ती आहे. मंदिर पूर्व-पश्‍चिम १३२ फूट, दक्षिणोत्तर ११५ फूट, उंची १५ फूट असून, शिखराची उंची २७ फूट आहे. मंदिरात प्रवेशासाठी दगडी दरवाजा आहे. (latest marathi news)

त्यावर नगारखाना आहे. परिसरात शितलामाता, खोकलीमाता, परशुराम, हनुमान, विठ्ठल-रुक्‍मिणी, महादेवाचे मंदिर आहे. पश्‍चिमेस महालक्ष्मीचे मंदिर आहे. त्या काळी मंदिरात येणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, म्हणून परिसरात खोदलेली पायविहीर आजही आहे.

मंदिराचा जीर्णोद्धार

ट्रस्टची १९५५ मध्ये स्थापना झाली. भाविकांच्या सहकार्याने १९६७ व १९८७ मध्ये टप्पाटप्प्याने मंदिराचा जीर्णोद्धार झाला. ट्रस्टतर्फे १९८८ मध्ये मंदिराचे सुशोभीकरण झाले. संकट दूर करीत मनोकामना पूर्ण करणारी आणि नवसाला पावणारी देवी अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कार्यक्रम होतात.

चैत्रात यात्रा भरते, तेव्हा अनेक भाविक नवसपूर्ती, कुळधर्म, जावळ काढण्यासाठी येतात. यात्रेपूर्वी देवीची पालखी काढण्याची जुनी परंपरा आहे. दर पौर्णिमेला मंदिराच्या आवारात पालखी निघते. मंदिरात गुढीपाडवा, अक्षयतृतीया, आषाढी एकादशी, श्रावणमास, गणेश चतुर्थी, शारदीय नवरात्रोत्सव, ललित पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, कोजागरी पौर्णिमा, कार्तिक स्नान, नरक चतुर्दशी, कार्तिकी एकादशी.

अष्टमी, त्रिपुरारी पौर्णिमा, मकरसंक्रांत, महाशिवरात्र, शितलामाता उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम होतात. दिनविशेष लक्षात घेऊन अभिषेक, सप्तशती पाठ, रुद्राभिषेक आदी कार्यक्रम होतात. मंदिरात शाश्‍वत अभिषेकाची योजना सुरू आहे. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान आदी भागातून भाविक येतात. त्यांच्यासाठी भक्त निवासाचे काम पूर्ण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT