Kapdane: Tribal children begging for water in the traditional manner of Dhondi Dhondi for rain. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Rain Update : धोंडी धोंडी पाणी दे सायमा पिकू दे..!

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : धुळे जिल्ह्यात पावसाळ्यातील पहिले मृग नक्षत्र संपूनही पावसाचा पत्ता नाही. जून उलटायला चार दिवस शेष आहेत. पेरण्या नाहीत. आबालवृद्धांचे डोळे आभाळाकडे लागून आहेत. पावसाचे वातावरण आहे.

पण पाऊस कोसळत नाही. केवळ शिडकावा होत आहे. शेतमजुरांच्या हाताला काम नाही. पाऊस पडावा. यासाठी देवाला साकडे घालण्यास सुरवात झाली आहे. आदिवासी मुलांनी आज पारंपारिक पद्धतीने पाणी मागण्यास सुरवात केली. (Dhule People Waiting for rainEven there is no rain in district dhule news)

‘धोंडी धोंडी पाणी दे

सायमा पिकू दे

धोंड्यानी खेती

पाणी वना राती’

आता जिल्ह्यात अशी पारंपारिक गिते गात, वरुण देवाची आळवणी करीत, ग्रामरक्षक देवतांना साकडे घालीत, आता तरी किव येवू दे रे देवा..असे म्हणत गल्लोगल्ली पाणी मागण्यासाठी मुले फिरू लागली आहेत.

धोंडी धोंडी पाणी दे चे महत्त्व पटविणारी पहिलीतील कविता आणि पारंपारिक गीत सारेच आळवू लागले आहेत. ‘अर्धी भाकर भात्यामा पाणी वना जंगलमा’ असेही ही बालके म्हणत आहेत. दारोदारी जाणाऱ्या, या धोंड्याचे पूजन होत आहे.

२०१७ मध्ये श्रावणमध्ये आणि २०२१ मध्ये जुलैमध्ये धोंडी धोंडी पाणी मागण्याची वेळ आली होती. २०१७ मध्ये पेरण्यांनतर पावसाने हुलकावणी दिली होती. थेट आठ जुलैनंतर पाऊस कोसळला होता. तर २०२१ मध्ये श्रावण/ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली होती. शेवटच्या श्रावण सोमवारी पावसाने हजेरी लावली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धोंड्याचे वर्ष देते दगा ?

यावर्षी तर अद्याप पेरण्याच नाहीत. आबालवृद्धांना पावसाची प्रतीक्षा आहे. जूनचे चारच दिवस उरले आहे. मृग संपला तरी शिवारात काळीभोर जमीन आहे. तिलाही हिरवाईने नटलेले साऱ्यांना बघायचे आहे. धोंड्याचे वर्ष अर्थात अधिक मास असलेले वर्ष हमखास दगा देते, असे जाणकार सांगतात. या पावसाळ्याच्या प्रारंभीच हा अनुभव खरा ठरत आहे.

जिल्ह्यात पेरण्याही रखडल्या

धुळे जिल्ह्यातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर आणि साक्री या चारही तालुक्यात कुठेही पाऊस नाही अन पेरण्याही नाहीत. दररोज पावसाचे वातावरण दिसते. ढगांची गर्दी दिसते. काळ ढग केवळ पावसाचा शिडकावा करून पुढे निघून जाता आहेत. आता तरी वरस अशी आर्त हाकेने सारेच विनवू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT