suspend esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : वडणे येथील प्राथमिक शिक्षक निलंबित; सीईओ गुप्तांकडून कारवाई

Dhule : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जुलै-२०२३ पासून मिशन उत्कर्ष हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या मिशन उत्कर्ष कार्यक्रमात दुर्लक्ष व निष्काळजीपणा केल्याप्रकरणी वडणे (ता. धुळे) येथील जिल्हा परिषद शाळेचे प्राथमिक शिक्षक मिलिंद मधुकर चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सीईओ शुभम गुप्ता यांच्या या कारवाईमुळे शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी जुलै-२०२३ पासून मिशन उत्कर्ष हा उपक्रम राबविण्यात येत आहे. (Dhule Primary teacher in Wadne suspended Action by CEO Gupta)

जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सातत्याने जिल्हास्तरावरून पाठपुरावा केला जात होता. ३१ मार्च २०२४ पर्यंत विद्यार्थ्यांच्या सध्याच्या स्तरावरून वाढ करून त्यांना असर स्तरापर्यंत पोचविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अभिनव गोयल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी वडणे (ता. धुळे) येथील जिल्हा परिषद शाळेस ११ जानेवारीला भेट दिली होती.

त्या वेळी तेथील प्रभारी मुख्याध्यापक मिलिंद चौधरी यांना अध्ययन प्रणालीबाबत विचारणा केली असता काहीच माहिती देता आली नाही. याबाबत श्री. चौधरी यांना शिक्षण विभागातर्फे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

सादरीकरणासही अनुपस्थित

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चित केले आहे का? अध्ययनस्तर वाढीसाठी कोणकोणत्या उपाययोजना, उपक्रम राबविण्यात आले याबाबत २० फेब्रुवारी २०२४ ला मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या दालनात सकाळी दहाला सादरीकरणासाठी बोलविण्यात आले. (Latest Marathi News)

मात्र, श्री. चौधरी सादरीकरणासाठी अनुपस्थित राहिले. त्यांची ही कृती पाहता श्री. चौधरी यांनी वरिष्ठांच्या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वरिष्ठांचा अवमान केला. तसेच शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी दुर्लक्ष केल्याने मिलिंद चौधरी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी निलंबित केले.

...तर इतरांवरही कारवाई

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात असताना काही शिक्षक हलगर्जी करीत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

यापुढील काळातदेखील जिल्हास्तरीय अधिकारी शाळा भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमाची पडताळणी करणार आहेत. त्यामध्ये कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास अशा शिक्षकांवरदेखील कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT