police (file photo) esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Police : धुळे जिल्हा पोलिस दलात खांदेपालट; अधीक्षक धिवरे यांचा निर्णय

Dhule Police : जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक पोलिस दलात खांदेपालट केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Police : जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक पोलिस दलात खांदेपालट केली आहे. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांसह महत्त्वाच्या विभागांचे ११ प्रभारी बदलले. धुळे तालुका पोलिस ठाण्याचा पदभार पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना, तर वाहतूक शाखेची जबाबदारी शिल्पा पाटील यांना दिली आहे. शिंदखेड्यात बाळासाहेब थोरात, दोंडाईचात किशोरकुमार परदेशी यांना प्रभारी केले आहे. गुरुवारी (ता.२५) रात्री उशिरा या बदल्या जाहीर झाल्या. (promotion of District Police Force Decision of Superintendent Dhivare )

पोलिस अधीक्षक धिवरे यांनी घेतलेल्या निर्णयात पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या एकूण ४० अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात शिंदखेडा पोलिस ठाण्याचे नवीन प्रभारी असतील. निरीक्षक अभिषेक पाटील (धुळे तालुका), निरीक्षक प्रमोद पाटील (आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखा), निरीक्षक दीपक पाटील (वाचक शाखा), निरीक्षक शिल्पा पाटील (शहर वाहतूक नियंत्रण शाखा), निरीक्षक किशोरकुमार परदेशी (दोंडाईचा), सहायक निरीक्षक शत्रुघ्न पाटील (थाळनेर ता. शिरपूर), सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे (पश्चिम देवपूर, धुळे), सहाय्यक निरीक्षक सचिन कापडणीस (सोनगीर ता. धुळे), सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे (पिंपळनेर ता. साक्री), सहाय्यक निरीक्षक नीलेश मोरे (नरडाणा ता. शिंदखेडा), निरीक्षक मृदुला नाईक प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक निरीक्षक भागवत पाटील (दोंडाईचा), सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील (शिरपूर शहर), उपनिरीक्षक किरण बर्गे (शिंदखेडा), सहाय्यक निरीक्षक विजय ठाकूर (आझादनगर).

सहाय्यक निरीक्षक दीपक पावरा (देवपूर), उपनिरीक्षक मनोज कचरे (शिरपूर तालुका), विनोद पवार (साक्री), अभय मोरे (सोनगीर), लक्ष्मी करंकार (देवपूर), राजश्री पाटील (आझादनगर), रवींद्र महाले (आझादनगर), छाया पाटील (धुळे तालुका), मनोज कुवर (साक्री), रामराव वाघ (थाळनेर ता.शिरपूर), गणेश कोळी (नियंत्रण कक्ष), नरेंद्र पवार (बीडीडीएस प्रभारी), कल्याणी पाटील (डायल ११२), किरण कोठुळे (जिल्हा विशेष शाखा), हरिश्चंद्र पाटील (चाळीसगाव रोड पोलिस ठाणे), विशाल पाटील (वाचक साक्री उपविभाग), प्रदीप सोनवणे (निजामपूर ता. साक्री), कृष्णा पाटील (धुळे तालुका), मिलिंद पवार (शिरपूर तालुका), सुनील वसावे (सांगवी ता.शिरपूर), हरफान काझी (नियंत्रण कक्ष), मनोज कचरे (शिरपूर तालुका) व अमरजित मोरे यांची शिरपूर शहर पोलिस ठाण्यात बदली झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Expressway : शक्तिपीठ महामार्गावर मोठा ट्विस्ट; फडणवीसांनी जाहीर केली नवी अलायमेंट, सोलापूर, सांगली ते कोल्हापूर नवा मार्ग

Nashik Development : वृक्षतोड वादाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ६८९ कोटींच्या कामांचा प्रारंभ; विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न?

Latest Marathi News Live Update: निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली दिखाऊ कामं मनसे कधीही सहन करणार नाही - राजेश चव्हाण

Video : अमेरिका पाकिस्तानला मदत का करते? माजी CIA एजंटकडून स्वत:च्याच सरकारची पोलखोल; देशाला हादरवणारी माहिती समोर...

Google ही नवी जादू! फक्त एक ओळ लिहा अन् App बनवा; Disco AI ब्राउजर करत आहे कमाल, पाहा कस वापरायचं

SCROLL FOR NEXT