Officials of Maharashtra State Power Board Contractual Labor Association, workers protesting
Officials of Maharashtra State Power Board Contractual Labor Association, workers protesting  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Electricity Worker Protest : वीज मंडळ कंत्राटी कामगारांचे धरणे

सकाळ वृत्तसेवा

Dhule Electricity Worker Protest : विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे राज्यव्यापी आंदोलन सुरू असून या आंदोलनाच्या पाचव्या टप्प्यात संघटनेच्या पदाधिकारी, कामगारांनी शहरातील क्युमाईन क्लब समोर धरणे आंदोलन केले.

दरम्यान, मागण्यांची दखल न घेतल्यास ५ मार्चपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले जाईल व राज्यभरातील ४२ हजार कामगार रस्त्यावर उतरतील असा इशारा संघटनेने दिला. (Dhule protest of electricity board contract workers)

१ एप्रिल २०२३ पासून तिन्ही कंपन्यांमधील वीज कंत्राटी कामगारांना मागील सर्व फरकासह ३० टक्के वेतनवाढ द्यावी, कंत्राटी कामगारांना मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशी लागू करून वयाच्या ६० वर्षापर्यंत रोजगारात सुरक्षा द्यावी.

सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे, सेवेत सामावून घेताना सर्व अनुभवी, कुशल कंत्राटी कामगारांना वयोमर्यादेत सूट देण्यात यावी, रानडे शिफारशीनुसार विशेष आरक्षण द्यावे, तिन्ही कंपनीतील भरतीसाठी वयोमर्यादा समान असावी, सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामास समान वेतन देण्यात यावे. (latest marathi news)

कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक मदत चार लाखांवरून १५ लाख करावी यासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. धरणे आंदोलनात संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष दीपक ओतारी, प्रशांत माळी, मोहन कानडे, स्वप्नील पवार, महेंद्र सोनवणे, योगेश साळवे, दिलदार माळी, राजेंद्र वानखेडे

सुनील गिते, योगेश गिरासे, हितेंद्र गिरासे, पांडुरंग पाटील, कैलास चित्ते, सुनील जगदाळे, कल्याण रामोळे, दीपक बडगुजर, मयूर माळी, प्रवीण पाटील, जयेश बडगुजर, कमलेश पाटील, राकेश बडगुजर, चंद्रकांत जाधव आदींसह इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT