The ongoing work of collecting waste at one place through Poklane at the Municipal Waste Depot. In the second photo, the Varkhedi road cleared by picking up garbage. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पावसाळ्यापूर्वी कचरा डेपोवर उपाययोजना; जेसीबी, पोकलेनद्वारे कचऱ्याचे ढीग

Dhule : पावसाळ्यात कचरा डेपोवर वाहनांना अडचणी निर्माण होऊ नयेत. रस्त्यावर कचरा टाकला जाऊ नये यासाठी महापालिकेतर्फे आत्तापासूनच उपाययोजना सुरू करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पावसाळ्यात कचरा डेपोवर वाहनांना अडचणी निर्माण होऊ नयेत. रस्त्यावर कचरा टाकला जाऊ नये यासाठी महापालिकेतर्फे आत्तापासूनच उपाययोजना सुरू करण्यात आली आहे. जेसीबी, पोकलेनद्वारे कचरा डेपोवरील कचरा एका ठिकाणी जमा करून कचऱ्याचे ढीग (हिप) करण्यात येत आहेत. शिवाय, कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदार संस्थेलाही शहरातून येणारा कचरा थेट डेपोच निश्‍चित करून दिलेल्या जागेवरच टाकावा, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी नोटीस बजावली आहे. ( Remedies on garbage depot before monsoon by municipal corporation)

दरवर्षी पावसाळ्यात महापालिकेच्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोवर समस्या निर्माण होतात. कचरा डेपोवर अस्ताव्यस्त टाकलेल्या कचऱ्यामुळे पावसाळ्यात कचरा संकलन करून जाणारी वाहने फसतात, स्लिप होतात. त्यामुळे डेपोमध्ये दूरपर्यंत वाहने जाऊ शकत नाहीत. परिणामी रस्त्यावर किंवा मिळेल त्या जागेवर कचरा टाकून वाहने माघारी फिरतात. त्यामुळे वरखेडी रोडवर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण होऊन वरखेडी येथील नागरिकांसह या रस्त्याचा वापर करणाऱ्या वाहनधारक, नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.

शिवाय, परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होऊन त्यांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण होतो. यातून तक्रारी, आंदोलनेही होतात. दरवर्षी निर्माण होणारी स्थिती पाहता महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी उपाययोजनेचे निर्देश दिले. त्यानुसार उपायुक्त हेमंत निकम, साहाय्यक आयुक्त समीर शेख यांनी कचरा डेपोवर जेसीबी व पोकलेनद्वारे कचरा एका ठिकाणी जमा करून तेथे वाहनांसाठी रस्ते करून देण्याचा निर्णय घेतला.(latest marathi news)

रस्ता मोकळा

त्यानुसार गेल्या दोन-तीन दिवसांपासून डेपोवर कचरा एका ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात वाहनांना कचरा टाकण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. प्रारंभी वरखेडी रोडवरील कचरा उचलण्याचे काम सुरू करण्यात आले. कचरा डेपो ते हायवेपर्यंतचा रस्ता मोकळा करण्यात आला आहे. या कामामुळे वरखेडी येथील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले.

ठेकेदाराला नोटिशीतून तंबी

दरम्यान, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, स्वच्छता निरीक्षक विकास साळवे यांनी कचरा संकलन करणाऱ्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट या ठेकेदार संस्थेलाही नोटिशीद्वारे ताकीद दिली. शहरातून येणारा टाकण्यासाठी कचरा कचरा डेपोवर ज्या ठिकाणी जागा निश्‍चित करण्यात आली आहे. त्याच ठिकाणी कचरा टाकण्यात यावा. तसे न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी तंबी नोटिशीद्वारे दिली आहे. यासाठी डेपोवरील लिपिक धनंजय सोनार पूर्ण वेळ काम करून घेण्याबाबत आदेश देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हायड्रोलिक लिफ्ट, कंट्रोल रूम, स्प्रिंकलर…; तरीही लालबागच्या राजाचं विसर्जन रखडलं, कोट्यवधी खर्चून गुजरातचा 'हायटेक तराफा' फुस्का!

Devendra Fadnavis: फक्त खरी नोंद असेल त्यालाच... GR नंतर फडणवीसांचा मराठा-ओबीसी आरक्षणावर मोठा खुलासा!

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुण्यात सलग ३१ तास विसर्जन मिरवणूक; गेल्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला

Shubman Gill होणार भारताच्या वनडे संघाचा कर्णधार, केवळ औपचारिकता बाकी? रोहित शर्माच्या भविष्याबाबत चर्चेला उधाण

Pune Ganesh Visarjan 2025: विसर्जन मिरवणुकीने मोडला रेकॉर्ड, २९ तासांनंतरही सुरू, पोलिसांचे नियोजन कोलमडले

SCROLL FOR NEXT