Collector Abhinav Goyal along with actors of famous Maharashtra comedy show on TV at Mahasanskrit Mahotsav.
Collector Abhinav Goyal along with actors of famous Maharashtra comedy show on TV at Mahasanskrit Mahotsav. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : महासंस्कृती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रंगतदार कार्यक्रम; धुळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शाहिरी बाणा, ठसकेबाज लावणी, शहनाई-तबला जुगलबंदीसह सांस्कृतिक नृत्य आणि हास्यकल्लोळ अशा रंगतदार कार्यक्रमांनी महासंस्कृती महोत्सवाला प्रारंभ झाला. धुळेकरांनी या कार्यक्रमांना उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

धुळे महासंस्कृती महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील. (Spontaneous response of Dhule people on first day of Mahasanskruti Mahotsav)

अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपवनसंरक्षक नितीनकुमार सिंग, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, मनपा उपायुक्त डॉ. संगीता नांदुरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व धुळेकर रसिक प्रेक्षक उपस्थित होते.

कार्यक्रमांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध

आर. के. शहनाई ग्रुप, धुळेचे राकेश गुरव व सहकाऱ्यांनी शहनाई-तबला जुगलबंदी सादर केली. सांगलीचे शाहीर पृथ्वीराज माळी व सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा सादर केला. आकांक्षा कदम यांच्या लावणीच्या ठेक्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत प्रभाकर मोरे, प्रथमेश शिवलकर यांनी शोले चित्रपटातील जय-वीरूची भूमिका, तर प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवानी परब, पृथ्वीक प्रताप, अभिजित कोसंबी, श्रावणी महाजन, आकांक्षा कदम, परेश दाभोळकर, गोकुळ पाटील यांच्या प्रहसनाने अवघे धुळेकर मंत्रमुग्ध झाले. (latest marathi news)

बुधवारी या कार्यक्रमांची मेजवानी

बुधवारी (ता. २८) सकाळी १० ते १०.३० ः ‘जागर लोककलेचा’ तथागत हा कार्यक्रम गौतमबुद्ध बहुउद्देशीय संस्था, धुळे हे सादर करतील. सकाळी १०.३० ते ११.३० ः पारिजात चव्हाण व सहकाऱ्यांचा ‘अंगणी पारिजात फुलला’, सकाळी ११.३० ते १२.३० अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूल.

जळगाव यांचे ‘मारुतीची जत्रा’ (बालनाट्य) दुपारी १२.३० ते १ ः चोपडा येथील दिनेश साळुंखे ‘बाहुल्यांचे विश्व (कठपुतली)’ हा कार्यक्रम सादर करतील. सायंकाळी ५ ते ६.३० ः अजिंक्य बगदे व सहकाऱ्यांचा ‘रायझिंग स्टार रॉक बॅण्ड’, सायंकाळी ६.३० ते ७.३० ः लोकमंगल कलाविष्कार सहकारी संस्थेतर्फे खानदेशी बाणा (गीत, गायन व नृत्य) कार्यक्रम.

सायंकाळी ७.३० ते रात्री १० ः प्रो. इव्हेटिस, मुंबई ओमकार वसुधा अशोक सावंत यांचा ‘वारी सोहळा संतांचा’ हा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमांना धुळे जिल्हावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT