Maize crop wilted due to continuous rains. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Agriculture News : धुळे तालुक्यात पिकांच्या वाढीस पोषक पाऊस; निंदणीवर अधिक खर्च

Dhule News : धुळे तालुक्यात बहुतांश पेरण्या मृग नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्या झाल्या. उर्वरित जूनअखेरपर्यंत पूर्ण झाल्या. पिकांच्या वाढीसाठी पोषक पाऊस होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : धुळे तालुक्यात बहुतांश पेरण्या मृग नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्या झाल्या. उर्वरित जूनअखेरपर्यंत पूर्ण झाल्या. पिकांच्या वाढीसाठी पोषक पाऊस होत आहे. महिनाभराची पिके चांगली तरारली आहेत. मात्र पाऊस होत असल्याने निंदणी आणि कोळपणीसाठी अधिक खर्च होत आहे. पिकांच्या पोषक वाढीने शेतकरी सुखावला आहे. (Sufficient rain for crop growth in taluk)

धुळे तालुक्याच्या काही भागात ७ जूनच्या रात्री अर्थात मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर ११ व १३ जूनला पोषक पाऊस झाला. पेरण्यांना प्रारंभ झाला होता. त्यानंतर अतिवृष्टीसदृश पाऊस झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या पेरण्या वाया गेल्या.

त्यांना दुबार पेरण्या कराव्या लागल्या. जूनअखेरपर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सातत्यपूर्ण मध्यम पाऊस होत आहे. या पावसाने पिकांची वाढ जोरकस होत आहे. (latest marathi news)

सातत्यपूर्ण पावसाने तण अधिक फोफावत आहे. शेतकरी निंदणी आणि कोळपणीच्या खर्चाने हैराण झाले आहेत. दरम्यान, तालुक्यात कपाशीसह मका व ज्वारीचे क्षेत्र वाढले आहे. कडधान्याचे क्षेत्र घटले आहे.

"निंदणीवर अधिक खर्च होत आहे. सततच्या पावसाने तण अधिक होते. ते पिकांना मारक असते. परिणामी कोळपणी आणि निंदणीही सातत्यपूर्ण करावी लागतेय." - भरत पाटील, कौठळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT