Ekvira Devi Yatrotsav  esakal
उत्तर महाराष्ट्र

Ekvira Devi Yatrotsav : श्री एकवीरादेवी यात्रोत्सवामुळे वाहतूक मार्गात तात्पुरता बदल

Dhule News : श्री एकवीरादेवीची यात्रेनिमित्त सोमवारपासून (ता. २२) ते आठ मे पर्यंत भाविकांची गर्दी होत राहील.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : श्री एकवीरादेवीची यात्रेनिमित्त सोमवारपासून (ता. २२) ते आठ मे पर्यंत भाविकांची गर्दी होत राहील. यात्रा, उत्सव काळात वाहतुकीचे नियम, नियोजन करता यावे व वाहतुकीची कोंडी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी वाहतूक मार्गाच्या ठराविक वेळेत बदल करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली. (Dhule Temporary change in traffic route due to Shri Ekvira Devi yatrotsav)

शहरात सोमवारपासून ते आठ मे या कालावधीत रोज सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंत नेहरु चौक (जुना आग्रा रोड) मुख्य प्रवेशद्वार ते श्री एकवीरादेवी मंदीरापर्यंतचा रस्ता, जुने धुळे ते नवीन पुल ते श्री एकवीरादेवी मंदिरापर्यंतचा रस्ता.

पंचवटी महादेव मंदिर ते जवाहरलाल नेहरु स्टेडियम टी पॅाईन्टचा रस्ता, प्रभात नगर ते जुने धुळे नवीन पुलापर्यंतचा रस्ता. (latest marathi news)

प्रभातनगर ते अमरधामकडून ते श्री एकवीरादेवी मंदिर पर्यंतचा रस्ता, वीर सावरकर पुतळा ते जुने धुळे नवीन पुलापर्यंतच्या मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात येत आहे.

या नमूद तारखांना तसेच विहीत वेळेत वाहतुक मार्ग बंद राहिल. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. ही अधिसूचना पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका व अग्निशामक दलाच्या वाहनांना लागू होणार नाही, असेही श्री. धिवरे यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT