court
court esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 31 हजार प्रकरणे निकाली, 32 कोटी भरपाई वसूल; राष्ट्रीय महालोकअदालत

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार रविवारी (ता. ३) संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय महालोकअदालतीचे आयोजन झाले. या महालोकअदालतीच्या माध्यमातून एकूण ३१ हजारांवर प्रकरणे निकाली काढण्यात आली, तर तब्बल ३२ कोटी रुपये तडजोड रक्कम वसूल झाली, अशी माहिती धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप वि. स्वामी यांनी दिली. (Dhule total of 31000 cases were settled through Mahalok Adalat)

या राष्ट्रीय महालोकअदालतीमध्ये प्रलंबित सहा हजार १६२ प्रकरणे व न्यायालयात दाखल होण्यापूर्वीचे सुमारे ९५ हजार १६३ अशी एकूण एक लाख एक हजार ३२५ प्रकरणे ठेवण्यात आली. त्यांपैकी प्रलंबित चार हजार ९१० व न्यायालयात दाखल होण्यापूर्वीचे ३० हजार ६५१ अशी एकूण ३१ हजार ६१ प्रकरणे निकाली निघाली. यातून ३२ कोटी सहा लाख ९१ हजार १७८ इतकी तडजोडीची रक्‍कम लोकअदालतीमध्ये वसूल झाली.

दहा दांपत्यांत समेट

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये कौटुंबिक वादाच्या प्रकरणांपैकी दहा प्रकरणांमध्ये यशस्वीपणे समुपदेशन करून दहा दांपत्यांचा संसार पुन्हा सुरू करण्यास यश लाभले. तसेच वृद्धाश्रमात राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेला तिची दोन्ही मुले सांभाळत नव्हती त्यामुळे मुलांविरुद्ध न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले होते.

हे प्रकरण राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आले. या प्रकरणातही यशस्वीरीत्या तडजोड घडवून आणण्यात आली. महिलेला तिच्या मुलांनी घरी घेऊन जाण्यास तयारी दर्शविली व त्यांनी त्यांच्या आईचा उपचार तसेच भावी काळात योग्य पद्धतीने सांभाळ करण्याची लोकअदालतीसमोर शाश्‍वती दिली. ते त्यांच्या आईला सोबत घरी घेऊन गेले. (latest marathi news)

अपघात प्रकरणे निकाली

मोटार अपघात नुकसानभरपाईच्या एका प्रकरणामध्ये संबंधिताला ५९ लाख रुपये नुकसानभरपाई मिळवून देण्यात आली. मोटार अपघात नुकसानभरपाईची एकूण १११ प्रकरणे तडजोडीने निकाली करण्यात आली. यात पाच कोटींपेक्षा जास्त रक्‍कम पक्षकारांना मिळवून देण्यात आली.

या लोकअदालतीसाठी सर्व पक्षकार, न्यायाधीश, धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष, सर्व सदस्य तसेच तालुका वकील संघ, पोलिस व सर्व कर्मचारी आदींचे अमूल्य सहकार्य लाभले. त्याबद्दल धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद व न्यायाधीश तथा सचिव स्वामी यांनी आभार व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena: पुन्हा उलथापालथ! शिंदे गटाचे सहा आमदार संपर्कात; ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

Graft with EMI Touch: भ्रष्ट अधिकाऱ्यांची 'उदारता'... EMI सारख्या हप्त्यात घेतायत लाच; पैसे देणाऱ्यावर बोजा पडू नये दिली सुविधा

Latest Marathi Live Latest News: शौचास बसण्याच्या कारणावरून जीवघेणा हल्ला; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घटना

Dhangar Community : धनगर आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन; धनंजय मुंडेंनी 'ते' आश्वासन न दिल्यास आत्मदहनाचा इशारा!

Robert Kiyosaki: तीन महिन्यात 5 पट वाढेल पैसा? रॉबर्ट कियोसाकी म्हणाला, 'सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी करा'

SCROLL FOR NEXT