Shrikant Dhiware, Kishore Kale felicitating Vilas Tatikondalwar and fellow employees as Dhule became the leader in dial 112 operation. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे जिल्हा राज्यात तिसरा, विभागात प्रथम; डायल 112

Dhule News : महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम- डायल ११२ अंतर्गत पीडित व्यक्तीस चार मिनिटांच्या आत पोलिस मदत पोचविल्यामुळे धुळे जिल्हा राज्यात तिसरा, तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम- डायल ११२ अंतर्गत पीडित व्यक्तीस चार मिनिटांच्या आत पोलिस मदत पोचविल्यामुळे धुळे जिल्हा राज्यात तिसरा, तर नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आला आहे. राज्यात यापूर्वी जिल्हा शेवटच्या क्रमांकावर होता. त्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रणालीच्या अंमलबजावणीवर यंत्रणेमार्फत भर दिल्यानंतर जिल्हा चांगली कामगिरी करू शकला आहे. (Dhule News)

त्यामुळे पोलिस यंत्रणेचा हुरूप वाढला आहे. पोलिस अधीक्षक धिवरे यांनी सांगितले, की महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिम- डायल ११२ या प्रकल्पाची राज्यात प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि पीडितास निर्धारित वेळेच्या आत मदत पोचविणे कर्तव्याचा भाग आहे. त्यानुसार जिल्ह्यात कार्यवाहीची तंतोतंत सूचना यंत्रणेसह सर्व पोलिस ठाण्यांचे अधिकारी, उपअधीक्षकांना दिली.

मदतीसाठी संपर्क

महाराष्ट्र इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टिमअंतर्गत प्रथमतः पीडित व्यक्तीने मदतीसाठी डायल ११२ ला संपर्क साधल्यावर मुंबई केंद्र किंवा नागपूर केंद्राला माहिती दिल्यावर ती धुळे जिल्हा डायल ११२ नियंत्रण कक्षाला प्राप्त होताच पीडित व्यक्ती ज्या ठिकाणी असेल त्याच्या जवळच्या पोलिस ठाण्याला दिली जाते.

तेथे नियुक्त पोलिस कर्मचारी त्या प्राप्त माहितीनुसार निर्धारित वेळेच्या आत पीडितास मदत पोचवितात. या सिस्टिमसाठी धुळे नियंत्रण कक्षात पाच संगणक, सुपरवायझर सिस्टिम कार्यान्वित आहे. जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यात डायल ११२ चे एकूण ३५ चारचाकी वाहने, ३४ दुचाकी वाहने आणि त्यावर एमडीटी टॅब बसविण्यात आले आहेत. या कार्यप्रणालीवर पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षकांचे नियंत्रण आहे.

जिल्हा ठरला अव्वल

धुळे जिल्हा डायल ११२ प्रणालीचा जानेवारीत पीडितास पोलिस मदत पोचविण्याचा प्रतिसादाचा वेळ (रिस्पॉन्स टाइम) हा १५.५१ मिनिटे असा होता. तो राज्यातील एकूण ४५ घटकांपैकी धुळे जिल्ह्यासाठी शेवटच्या क्रमांकावर होता. त्यावर पोलिस अधीक्षक धिवरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या प्रणालीत सुधारणा होण्यासाठी प्रयत्न सुरू केले. (latest marathi news)

त्यामुळे फेब्रुवारीतील प्रतिसादाचा वेळ १०.३५ मिनीट झाला. परिणामी, राज्यात धुळे जिल्हा ४० व्या क्रमांकावर आला. यानंतरही सतत आढावा घेत, स्थितीत सुधारणा करून पीडितास तत्काळ पोलिस मदत पोचावी यादृष्टीने पोलिस अधीक्षक धिवरे यांनी काटेकोर नियोजन केले. त्यासाठी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास ताटीकोंडलवार यांना सूचना देत मार्गदर्शन केले.

त्यामुळे मार्चमध्ये पीडिताला मदत पोचविण्याची प्रतिसादाची वेळ ३.५० मिनिटांवर आली आणि धुळे जिल्हाही राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला. प्रथम क्रमांकावर मीरा भाईंदर, द्वितीय क्रमांकावर मुंबई शहर आहे.

धुळे टिमचे अभिनंदन

धुळे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आणि नाशिक परिक्षेत्रात प्रथम क्रमांकावर आल्याने पोलिस अधीक्षक धिवरे यांनी डायल ११२ च्या धुळे टिमचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या कामगिरीत पोलिस अधीक्षक धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनात डायल ११२ कार्यप्रणालीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास ताटीकोंडलवार, महिंद्रा डिफेन्सचे अभियंता योगेश कापडे, तुषार सोनवणे, डायलचे हवालदार वाघ, खलाणे, निकुंभे, भोई, बोरसे, शेंडगे, चौधरी व सर्व पोलिस ठाण्यांचे योगदान लाभले. त्यामुळे यंत्रणेचा हुरूप वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

अमरीश पुरी नाही, 'हा' अभिनेता असता 'मिस्टर इंडिया'चा मोगॅम्बो; अचानक दाखवला बाहेरचा रस्ता, आजही होतोय पश्चाताप

SCROLL FOR NEXT