A dried up dam esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Water Crisis : दुष्काळमुक्तीसाठी ठोस कामांचा अभाव! दुष्काळमुक्त चळवळ; पाणीदार गावे केव्हा होतील?

Water Crisis : धुळे जिल्ह्यात दोन-तीन वर्षांआड दुष्काळी स्थिती असते. दुष्काळ निवारण्यासाठी २०१८ मध्ये ठोस प्रयत्न सुरू झाले होते.

जगन्नाथ पाटील

कापडणे : धुळे जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. सर्वसामान्य जनता दुष्काळामुळे त्रस्त झाली आहे. पाणीटंचाईसह चाराटंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होताना दिसत नाही. जलयुक्त शिवाराचीही कामे बंद आहेत. यासाठी शासनासह लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी शाश्वत उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे. या वर्षी कोठेही दुष्काळ निवारण्यासाठी लोकचळवळ सुरू नसल्याचे पुढे आले आहे. (Dhule Water Crisis Lack of concrete works for drought relief)

पाणी फाउंडेशन

धुळे जिल्ह्यात दोन-तीन वर्षांआड दुष्काळी स्थिती असते. दुष्काळ निवारण्यासाठी २०१८ मध्ये ठोस प्रयत्न सुरू झाले होते. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ठोस कामे सुरू झाली होती. मोजक्या गावांमध्ये लोकचळवळ तयार झाली होती. पाणी फाउंडेशनने मोठी कामे सुरू केली होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बक्षिसेही दिली होती. आता पुन्हा एकदा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून कामे सुरू होणे गरजेचे असल्याचे पाणी चळवळीतील कार्यकर्ते संदीप पाटील यांनी सांगितले.

जलयुक्त शिवार

दर वर्षी काही प्रमाणात का असेना, जलयुक्त शिवारांतर्गत विविध कामे सुरू होती. या वर्षी कोणतीही कामे सुरू नसल्याचे संबंधित जाणकार सांगतात. आता पावसाळा अवघा महिन्यावर आला आहे. आतातरी जलयुक्त शिवार कामांना गती देण्याची मागणी होत आहे.

लोकचळवळीचा अभाव

गावोगावी बेरोजगारी आणि हाती काम नसलेल्या प्रौढांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्या माध्यमातून दर वर्षी पाणीदार चळवळ उभी करता येईल. यासाठी पुढाकार घ्यायला कोणी तयार नाही. विकासकामांसाठी निधी मिळविण्यासाठी धडपडणारे खूप आहेत. निधी आल्यानंतर डल्ला मारणारेही कमी नाहीत. पाण्यासाठी लोकचळवळ उभी करण्यासाठी पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. (latest marathi news)

आम्ही फक्त निवडणूक लढवू

विविध कार्यकारी संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी निवडणुका लढविण्यासाठी बरेच जण पुढे येतात. ते विकासाची स्वप्ने दाखवितात. त्यानंतर निवडलेलेही अन् पडलेलेही गायब होतात. जणू काही आम्ही केवळ निवडणूक लढवू, लोकचळवळ तुम्हीच लढवा, अशी त्यांची मानसिकता असल्याचे चर्चिले जात आहे.

तरुणांनी घ्यावा पुढाकार

तरुणांनी प्रत्येक गाव पाणीदार करण्यासाठी पुढे आले पाहिजे. प्रशासन, शासन आणि लोकप्रतिनीधींवर अवलंबून राहण्यापेक्षा ठोस पावले उचलली पाहिजेत. गावातील दातृत्ववानांच्या माध्यमातून गावे पाणीदार शक्य असल्याचे पाणीदार चळवळीतील कार्यकर्त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

SCROLL FOR NEXT