Members of wildlife conservation organization and forest staff while releasing snakes in the local forest. Members of the Wildlife Conservation Society catching snakes. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : एकाच दिवसात पकडले 8 साप! पावसाळ्यात विशेष काळजीचे वन्यजीव संरक्षण संस्थेकडून आवाहन

Dhule : दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी (ता.१०) वन्यजीव संरक्षण संस्थेने एकाच दिवशी पिंपळनेर शहर व परिसरातून तब्बल आठ साप व एक घोरपड पकडले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी (ता.१०) वन्यजीव संरक्षण संस्थेने एकाच दिवशी पिंपळनेर शहर व परिसरातून तब्बल आठ साप व एक घोरपड पकडले. ज्यात तीन धामण, एक नाग, एक मांडुळ, एक दिवड, एक कवड्या व एक तस्कर जातीचा असे साप आहेत. हे साप वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत जाऊन जंगलात सोडून दिले. पावसाळ्यात पावसाचे पाणी सापांच्या बिळात शिरत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात साप निवारा शोधण्यासाठी बाहेर पडतात. (Wildlife Conservation Society appeal for special care during monsoon season )

अशातच मनुष्यवस्तीकडे कोरड्या ठिकाणी जसे की घरात वा जळाऊ लाकडे, भंगार, किंवा घराचा आजूबाजूचा, अडचणीचा, अडगळीच्या ठिकाणी साप हे वास्तव्य करतात. यामुळे सापांपासून काळजी घेण्याचे आवाहन वन्यजीव संरक्षण संस्थेने केले आहे. सर्वच साप हे विषारी नसतात तरी जिल्ह्यात प्रमुख नाग, घोणस, मण्यार व फुरसे हे विषारी साप आढळतात.

सर्पदंश झाल्यास मांत्रिक बुवाकडे न जाता जवळील शासकीय रुग्णालयातच जावे, पावसाळ्यात रात्रीचा वेळी फिरताना टॉर्च सोबत ठेवावी, घराचा जवळील परिसर स्वच्छ ठेवावा, सापाला लपायला जागा मिळणार नाही, अडचणीच्या ठिकाणी वा जळाऊ लाकडांना पूर्ण खात्री करूनच हात लावावा, तसेच बूट घालताना बुटात साप नसल्याची खात्री करावी व साप दिसल्यास त्याचा जवळ न जाता त्याला इजा न करता जवळील सर्पमित्राला बोलवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. (latest marathi news)

जिल्ह्यातील सर्पमित्रांचे नाव व नंबर

निर्भय साखला, धुळे - ९९२२२९५५११

प्रमोद गायकवाड, अध्यक्ष वन्यजीव संरक्षण संस्था पिंपळनेर - ८८८८३५९७६७

दानिश पटेल, पिंपळनेर - ९१७२६१७७९८

ओम सोनवणे, पिंपळनेर - ९०२२७७२३८८

किरण ठाकरे, पारगाव - ७७९६४८६१९३

अमोल बहिरम, मंडाणे - ९३५९३७३०८८

हरी बहिरम, मंडाणे - ८००७९१९२१७

अजय भोये, पखरून पानखेडा - ९६०७१२१६१७

अजय कोकणी, छडवेल कोर्डे - ९३२२५८२४२१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navgaon ZP School: गरीब विद्यार्थ्यांची शाळा झाली नरकयात्रा... शौचालय बंद, इमारत ढासळलेली, मुंबईजवळ ही परिस्थिती तर...?

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये मुसळधार! 'पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मुत्यू'; कामावरून घरी येत हाेता अन्..

कुख्यात गुंडाचा खून करून नातेवाईकांना भेटण्यासाठी बीअर बारमध्ये बसले, कोल्हापूर पोलिसांवर गेम करणाऱ्यांचा झाला करेक्ट कार्यक्रम

Asia Cup 2025 Super Four Scenario: भारतीय संघ पात्र, पाकिस्तानची बहिष्कारची धमकी; मग, उर्वरित ३ संघ कसे ठरणार?

SCROLL FOR NEXT