gram sabha  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : तंटा प्रमाणात वाढ; ग्रामसभेच्या माध्यमातून महिलांना सामाजिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळावी

Dhule : तांड्यांवर खऱ्या अर्थाने शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गावातील भांडणतंटे गावातच मिटविण्यासाठी गावोगावी तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राज्यातील कान्याकोपऱ्यातील गाव, वाड्या, वस्त्या, तांड्यांवर खऱ्या अर्थाने शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गावातील भांडणतंटे गावातच मिटविण्यासाठी गावोगावी तंटामुक्त गाव समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, बहुतांश गावांतील समितीला मरगळ आल्याने तंटे मिटविण्यासाठी तंटामुक्ती समित्यांकडून ठोस पावले उचलण्यात येत नसल्यामुळे तंट्यांतील दोन्ही पक्ष पोलिस ठाण्याच्या पायऱ्या चढत असल्याचे वास्तव चित्र आहे. ( Women should get an opportunity to participate in social work )

वाढती लोकसंख्या लक्षात घेता त्या तुलनेत प्रत्येक पोलिस ठाण्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी यांची संख्या अपुरी आहे. शांतता व सुरक्षितता अबाधित ठेवताना नेहमीच पोलिस प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. हे लक्षात घेऊन त्या अनुषंगाने राज्यांचे तत्कालीन दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गावातील तंटे गावातच मिटावेत यासाठी १५ ऑगस्ट २००७ ला या योजनेची सुरवात केली होती.

तंटामुक्त गाव मोहिमेतील सर्व निकष पूर्ण करणाऱ्या गावांना विशेष बक्षीस रूपाने गाव विकासासाठी रक्कम दिली जात होती. सध्या या योजनेची अंमलबजावणी कशी होत आहे, याची माहितीदेखील उपलब्ध होणे कठीण झाले आहे. तंटामुक्त गाव समिती कशी असावी, समितीचा अध्यक्ष व इतर सदस्यांमध्ये कशा व्यक्तींचा समावेश असावा याबाबत निकष राज्य शासनाकडून निश्चित करण्यात आले. प्रत्यक्षात मात्र काही गावे वगळता बहुतांश गावांमध्ये हे निकष डावलण्यात आल्याचे सांगण्यात येते. (latest marathi news)

अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांनी आपल्या मर्जीतील आणि कायद्याचे ज्ञान नसलेल्या व्यक्तींचा समावेश करून समित्या स्थापन केल्याची ओरड आहे. काही गावांत स्वतःच मद्यपान करून वाद घालणारे अध्यक्ष तसेच सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अशा समित्यांकडून तंटे कसे मिटणार, असा प्रश्न सुज्ञ ग्रामस्थांना पडला आहे.

बहुतांश समित्या निव्वळ नाममात्र कार्यरत आहेत. तंटा मिटविण्यासाठी अनेक गावांतील समितीच्या अध्यक्षावर ग्रामस्थांकडून अविश्वास दाखवला जात आहे. त्यामुळे तंटामुक्त समितीची कर्तव्ये कोणती व ती भूमिका काय घेताहेत, यातील विसंगतीने अनेक गावचे ग्रामस्थ नाराज आहेत. अनेक गावांमध्ये हातभट्टीची दारू, गावातील अवैध धंदे बंद व्हावेत, गुन्हेगारी नियंत्रणात यावी तसेच शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी निष्क्रिय असलेल्या तंटामुक्त गाव समित्यांची फेररचना करावी, अध्यक्षांची फेरनिवड करावी, अशी मागणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये होते.

महिलांचा करावा समावेश

तंटामुक्त समितीत जास्तीत जास्त महिलांचा समावेश झाला तर गावपातळीवर सामाजिक सलोखा, सौहार्द, शांतता राखण्यास मदत होणार आहे. तसेच गावस्तरावर अनेक महिला सामाजिक आणि राजकीय कार्यात स्वतःला सिद्ध करीत आहेत. अशा अधिकाधिक महिलांना ग्रामसभेच्या माध्यमातून गावपातळीवर सामाजिक कार्यात भाग घेण्याची संधी मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT