On the occasion of Yatra, attractive lighting on the temple of Goddess Jogamaya and the idol of Jogani Mata. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कापडणेत आजपासून कुलदेवतांचा यात्रोत्सव!

Dhule News : खानदेशातील तेरा कुळांची कुलदैवत जोगाईमाता, खलाणे कुळाची कुलदैवत पाचपावली माता आणि अखिल वाणी समाजाचे कुलदैवत अन्नपूर्णा मातेचा यात्रोत्सव सोमवार पासून चैत्र चतुर्दशीपासून सुरू होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : खानदेशातील तेरा कुळांची कुलदैवत जोगाईमाता, खलाणे कुळाची कुलदैवत पाचपावली माता आणि अखिल वाणी समाजाचे कुलदैवत अन्नपूर्णा मातेचा यात्रोत्सव सोमवार (ता. २२)पासून चैत्र चतुर्दशीपासून सुरू होत आहे. यात्रेसाठी खानदेशासह राज्यभरातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. 9Dhule yatra of Kuladevata in Kapadane from today)

जावळ आणि शेंडी अर्पण करण्यासह विविध नवस पूर्ण करण्यासाठी भाविकांची मांदियाळी वाढणार आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याची व्यवस्था विश्वस्त मंडळांनी केली आहे. कापडणे हे धुळे शहरापासून अवघे सोळा आणि मुंबई-आग्रा महामार्गापासून तीन किलोमीटरवर आहे.

जोगाई, अन्नपूर्णा, पाचपावली, जोगाईमाता तेरा कुळांची कुलदेवता आहे. अन्नपूर्णामातेची राज्यात केवळ दोनच प्रतिष्ठापित मंदिरे आहेत. (latest marathi news)

त्यांपैकी एक येथे आहे. राज्यभरातील वाणी समाज येथे वर्षभर दर्शनासाठी येत असतात. पाचपावली माता खलाणे कुळाचे कुलदैवत आहे.

"यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांना वाढत्या तापमानाचा फटका बसू नये म्हणून गार पाण्यासह थंडपेयाचीही व्यवस्था केलीय. भाविकांनी तापमानाचा विचार करता पूर्ण खबरदारी घ्यावी. बोकडबळी टाळावा." -अरुण पाटील, अध्यक्ष, जोगाईमाता विश्वस्त मंडळ, कापडणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT