Vandalism of vehicles esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : जैताणे येथे युवकाचा मारहाणीत मृत्यू; 4 संशयितांवर गुन्हे दाखल, तिघांना अटक

Dhule Crime : जैताणे (ता. साक्री) येथे प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकरास मुलीच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केली. यात उपचारांदरम्यान त्याचा शुक्रवारी (ता. २०) मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

सोनगीर : जैताणे (ता. साक्री) येथे प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रियकरास मुलीच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केली. यात उपचारांदरम्यान त्याचा शुक्रवारी (ता. २०) मृत्यू झाला. या प्रकरणी चार संशयितांवर गुन्हे दाखल असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. युवकाच्या मृत्यूने संतप्त आदिवासी भिल्ल समाजाने घटनेचा टायर जाळून निषेध करीत शनिवारी (ता. २१) रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे गावात तणाव निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांनी दुकाने, व्यवहार बंद केले. अजय भवरे (वय २०, रा. भिलाटी, जैताणे) असे मृताचे नाव आहे. (youth was beaten to death 4 suspects have been charged have been arrested )

भवरे हा बुधवारी (ता. १८) पहाटे त्याच्या प्रेयसीला भेटायला गेला. तिच्याशी गप्पा मारत असताना तुकाराम शिंदे, वैभव शिंदे, रावसाहेब शिंदे, रवींद्र धनगर यांनी त्यास पकडले. त्याला जातिवाचक शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना अजयचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी राजेंद्र भवरे यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चार संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तुकाराम शिंदे, रावसाहेब शिंदे व रवींद्र धनगर या तिघांना अटक झाली. दरम्यान, शनिवारी सकाळी मृताच्या नातेवाईक व समाजबांधवांनी पोलिस ठाण्यासमोर गर्दी करीत ‘संशयितांना आमच्यासमोर आणा’ अशी मागणी केली. (latest marathi news)

तत्पूर्वी, टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. तणावपूर्ण परिस्थितीमुळे गावातील व्यवहार बंद झाले. घटना समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बाबळे, निजामपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मयूर भामरे, उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे कोणीही कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये, शांतता ठेवावी, असे आवाहन केले. दरम्यान, तणावाची परिस्थिती पाहता व विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता जैताणे येथे शाळा सोडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना, काही जण अडकल्याची भीती; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Nagpur Leopard Rescue : इंजेक्शन मारलं अन् जाळीत पकडलं; भरवस्तीत शिरलेला बिबट्या जेरबंद, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक घटनाक्रम

Kitchen Hacks: हिवाळ्यात सहज सेट होईल मलाईदार दही; जाणून घ्या एकदम सोपा घरेलू उपाय

Stree Mukti Parishad : स्वातंत्र्याचा वारसा सांभाळणे काळाची गरज; धार्मिक बंधनेच महिलांवरील अत्याचारांचे मूळ: लीलाताई चितळे

फक्त दीड लाख लोकसंख्या असलेला देश फीफा वर्ल्डकपसाठी पात्र; प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत घडवला इतिहास

SCROLL FOR NEXT