After the Nashik Graduate Constituency Election Code of Conduct came into effect, the municipal team took action to remove the banners of political parties and cover the boards in the city. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : बॅनरबाजीमुळे होणाऱ्या विद्रूपीकरणाला लागणार ‘ब्रेक’! महापालिकेकडून कारवाई

सकाळ वृत्तसेवा

धुळे : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहरात ठिकठिकाणी लागलेले राजकीय पक्षांचे बॅनर, झेंडे काढण्याची कारवाई केली. आचारसंहिता लागल्यानंतर सुरू झालेली ही कारवाई अद्यापही सुरू आहे.

यानिमित्ताने का होईना मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजीमुळे होणारे विद्रूपीकरण थोडेफार का होईना कमी होण्यास मदत झाल्याची भावना काही सुजाण धुळेकर नागरिकांनी व्यक्त केली. (disfigurement caused by banner fighting will break Action by Municipal Corporation Dhule News)

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम २९ डिसेंबर २०२२ ला जाहीर झाल्यानंतर त्याच दिवशी आचारसंहिता लागू झाली. या निवडणूक आचारसंहितेमुळे महापालिकेसह विविध शासकीय कामांना ‘ब्रेक’ लागला. दरम्यान, वेगवेगळ्या कारणांनी राजकीय पक्षांकडून शहरात मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी होत असते.

वर्षभर अशा बॅनरबाजीतून शहरातील मुख्य रस्ते, चौकांचे विद्रूपीकरण झालेले पाहायला मिळते. आचारसंहितेच्या निमित्ताने किमान राजकीय पक्षांचे बॅनर, झेंडे काढले जातात. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून गेल्या तीन-चार दिवसांपासून ही कारवाई सुरू आहे.

शहरातील मालेगाव रोड, साक्री रोड, पारोळा रोड, देवपूर परिसर, फाशीपूल, सुरत बायपास, महापालिकेची जुनी इमारत परिसर, आग्रा रोड आदी विविध भागांत विविध राजकीय पक्षांनी लावलेले छोटे-मोठे बॅनर, झेंडे महापालिकेच्या पथकाने उतरविले.

दरम्यान, काही ठिकाणी विविध कामांच्या कोनशिलांवर राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांचे नावे असतात, त्यामुळे आतापर्यंत अशा सात-आठ कोनशिलाही झाकण्यात आल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

फलकांवर लावले कागद

शहरात ठिकठिकाणी राजकीय पक्षांचे कायमस्वरूपी शाखाफलकही आहेत. विशेषतः विविध चौकांमध्ये असलेले असे फलक महापालिकेच्या पथकाने कागद चिपकवून ते झाकण्याचा प्रयत्न केला. राजकीय व्यक्तींची नावे दिसणार नाहीत अशा पद्धतीने ती झाकण्यात आली.

गेल्या तीन-चार दिवसांत झालेल्या या बॅनर, फलक, झेंड्यावरील कारवाईत साधारण दीडशे बॅनर उतरविल्याचे अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख प्रसाद जाधव यांनी सांगितले.

विद्रूपीकरणाला ‘ब्रेक’

शहरात राजकीय पक्षांसह इतर विविध संघटनांकडून तसेच गल्लीबोळातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून विविध कार्यक्रम, वाढदिवसानिमित्त, आपल्या नेत्यांचा उदोउदो करण्यासाठी बॅनरबाजी केली जाते. परिणामी शहरातील मुख्य रस्ते, चौक बॅनरबाजीने झाकलेले पाहायला मिळतात.

यातील बहुतांश बॅनर अनधिकृतरीत्या अर्थात परवानगी न घेता लावल्याचे पाहायला मिळते. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होते. आचारसंहितेच्या निमित्ताने किमान राजकीय पक्षांचे बॅनर, झेंडे उतरल्याने थोड्याफार प्रमाणात व काही दिवस का होईना शहराच्या विद्रूपीकरणाला ब्रेक लागल्याची भावना उमटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT