Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अनधिकृत बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रूपीकरण; धुळे महापालिकेचे कारवाईचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महापालिका क्षेत्रात सार्वजनिक अथवा खासगी ठिकाणावर जाहिरात, बॅनर, फलक लावण्यासाठी व्यक्‍ती, संस्था, राजकीय पक्षांनी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.

मात्र बहुतांशप्रसंगी अशी परवानगी न घेता अनधिकृतपणे जाहिराती, बॅनर लावण्यात येतात. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत आहे, असे नमूद करत याबाबत कारवाई करण्यात येत आहे. (Disfigurement of city due to unauthorized banners in dhule news)

त्यामुळे नागरिकांनी बॅनर लावण्यासाठी नियमानुसार परवानगी घ्यावी, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले.उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने अनधिकृत जाहिराती, घोषणाफलक, होर्डिंग, पोस्टर्स या संदर्भात करावयाच्या कारवाईबाबत अपर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखालील २०२२ मध्ये झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सर्व महापालिका, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी अनधिकृत जाहिराती, होर्डिंग, पोस्टर्स इत्यादी निष्कासनाच्या अनुषंगाने वेळोवेळी कारवाई करावी, विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार धुळे महापालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय अर्थात अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणाऱ्या व्यक्तीवर, छपाई केंद्रावर कारवाई करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर धुळे महापालिका क्षेत्रात सार्वजनिक, खासगी ठिकाणी जाहिरात, बॅनर, फलक बेकायदेशीरपणे लावू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांनी केले आहे.

शुल्क भरून परवाना घ्या

धुळे महापालिका क्षेत्रातील सर्व अनधिकृत पोस्टर, बॅनर काढण्याचे काम महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून करण्यात येत आहे. धुळे महापालिकेने जाहिरातफलकाची परवानगी देण्यासाठी कोणत्याही संस्थेची नेमणूक केलेली नाही. यासाठी ‘वन विंडो’ पद्धतीनुसार धुळे महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील जाहिरात विभागात अर्ज सादर करून नियमाप्रमाणे जाहिरात शुल्क भरून परवाना मिळवून घ्यावा.

दरम्यान, अर्जदाराने जाहिरातफलकावर परवाना क्रमांक छापणे बंधनकारक आहे. त्याशिवाय जाहिरात अधिकृत समजण्यात येणार नाही. जाहिरातीवर परवाना क्रमांक नसल्यास कारवाई करण्यात येईल, असेही अतिरिक्त आयुक्त श्रीमती डहाळे यांनी नमूद केले आहे.

या क्रमांकांवर तक्रार नोंदवा

महापालिका क्षेत्रात बेकायदेशीरपणे बॅनर, फलक लावलेला आढळून आल्यास धुळे महापालिकेच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३३०१०, तर व्हॉट्सॲप व एसएमएससाठी ७८७५२००९२५ या क्रमांकावर तक्रार दाखल करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT