Divyang
Divyang 
उत्तर महाराष्ट्र

दिव्यांगांसाठी ईटीसी सेंटर उभारण्याचा निर्णय

सकाळवृत्तसेवा

नाशिक - दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने ईटीसी सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत शिक्षण, प्रशिक्षण, सेवा सुविधा केंद्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रकल्पासाठी सुमारे १७ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

महापालिकेतर्फे दिव्यांगांसाठी विविध योजना अंमलात आणल्या जात आहेत. त्या योजनांच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या सुविधा एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली जाणार आहे. शिवाजीवाडी घरकुल योजनेलगतच्या पब्लिक ॲमेनिटीसाठी राखीव असलेल्या सहा हजार ४६५ चौरसमीटर क्षेत्रात केंद्र उभारले जाणार आहे.

केंद्रात प्रशासकीय कार्यालय, थेरपी कक्ष, प्रशिक्षण वर्गखोल्या, वाचनालय, बहुउद्देशायी सभागृह, एक्वाथेरपी पूल आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. ईटीसी सेंटरमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, पहिली ते दहावीपर्यंतच्या शैक्षणिक सुविधा, रोगनिदान व उपचार केंद्र, आरोग्य तपासणी केंद्र, फिजिओथेरपी केंद्र, व्यावसाय, कला व शिक्षणथेरपी केंद्र, स्वयंरोजगार केंद्र, दिव्यांगांच्या पालकांसाठी प्रशिक्षण केंद्र, वाचनालय, ऑडिटोरियम आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

आउटसोर्सिंगचा पर्याय
प्रशिक्षण केंद्राची उभारणी झाल्यानंतर त्यासाठी कर्मचारीवर्ग व अन्य कामांसाठी मनुष्यबळाची आवश्‍यकता राहणार आहे. महापालिकेने शासनाकडे आकृतिबंध सादर केला आहे. त्या आकृतिबंधाला मान्यता मिळाली, तर त्यातून कर्मचारीवर्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे. परंतु वेळेत कर्मचारीवर्ग उपलब्ध न झाल्यास महापालिकेकडून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून केंद्र चालविले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT