A dog that has not moved since Sunday night, from a dog that died in an accident.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: ही दोस्ती तुटायची न्हाय..! काळगाव रस्त्यावर दिलदार श्वानाचा मित्रासाठी शोक

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मैत्रीवर अनेक चांगले, वाईट प्रसंग चित्रपट, कथा-कादंबऱ्यामध्ये रंगविले जातात. पण मुक्या प्राण्यांची मृत्यूनंतरचीही मैत्री मात्र... अखेरपर्यंत ‘ही दोस्ती तुटायची न्हाय...’ हेच सिद्ध करत असते.

येथील काळगाव रस्त्यावरील अमरावती नदीपात्रात रविवारी (ता. १२) रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत कुत्र्याच्या मृत्यूनंतरचे मैत्रीचे चित्र पाहून पाहणाऱ्यांचे डोळे पाणावत असल्याचे चित्र आहे. (dog does not move at all from dead dog dhule news)

येथील काळगाव रस्त्यावरील अमरावती नदीपात्रात रविवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकेत एक कुत्रा मरण पावला. एरवी दिवसभर मित्र म्हणून नेहमी सोबत फिरणाऱ्या अन्य जिवाभावाच्या कुत्र्याने मात्र मृत पावलेल्या कुत्र्याच्या जाण्याचा मोठा धसका घेतला आहे. रविवारी रात्रीपासून हा कुत्रा मृत पावलेल्या कुत्र्यापासून जराही हलत नसल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. अलीकडे माणुसकी लुप्त होत चालली आहे.

माणूस माणसाचा वैरी झाला आहे. तुटपुंज्या पैशांसाठी माणूस एकमेकांच्या जिवावर उठला आहे. आता माणुसकीच जिवंत नसल्याचे उघडपणे बोलले जाते.

मात्र स्वार्थाने बरबटलेल्या जमान्यात मुक्या पशू-प्राण्यांमधील मूक संवेदना आजही जिवंत असल्याचे दिसून आले. आपल्यासोबतच्या एका साथीदाराचा अपघातात मृत्यू झाल्याचे तीव्र दुःख सोबतचा कुत्रा त्या जागेवरून रात्रीपासून तसूभर हलत नसल्याचे वास्तव दर्शवितो आहे.

हे चित्र रविवारी रात्रीपासून अनेक जणांनी प्रत्यक्ष अनुभवले आहे. माणुसकी हरवली आहे. तसेच माणसाच्या चुकीमुळे निष्पाप मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. याची जाणीव संवेदनशील मनाला चटका लावून जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT