Traffic Management esakal
उत्तर महाराष्ट्र

Dr. Ambedkar Jayanti : धुळ्यात 4 मार्गांच्या वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा

Jal Jeevan Mission : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शुक्रवारी (ता. १४) जयंती साजरी होणार आहे. या दिवशी धुळे शहरातील विविध भागातून मिरवणुका निघणार आहेत.

त्या जेल रोडमार्गे धुळे शहर पोलिस ठाण्यासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ एकत्र येतात. त्यामुळे चार मार्गांच्या वाहतुकीत बदलाची अधिसूचना जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी बुधवारी जारी केली आहे. (Dr. Ambedkar Jayanti 4 road traffic changes in Dhule news)

मिरवणुकीत शहरातील तसेच ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक पुतळा परिसरात अभिवादनासाठी येतात. या कार्यक्रमास गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी व मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून खबरदारीसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात येत असल्याचे श्री.

बारकुंड यांनी सांगितले. त्यानुसार शहरातील कमलाबाई हायस्कूल चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मामलेदार कचेरी ते डॉ.

आंबेडकर पुतळा, संतोषीमाता मंदिर ते आंबेडकर पुतळा, बसस्थानक ते आंबेडकर पुतळ्यापर्यंतचा रस्ता शुक्रवारी (ता. १४) सकाळी सहापासून ते शनिवारी (ता. १५) सकाळी सहापर्यंत बंद राहील.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन श्री. बारकुंड यांनी केले. या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी पोलिस मुख्यालय प्रवेशद्वार मार्गाने बसस्थानकात येतील व त्याच मार्गाने जातील.

पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका आणि अग्निशमक दलाच्या वाहनांना वरील निर्बंध लागू होणार नाहीत. वरील मार्गात व वेळेत स्थितीनुसार बदलाचे अधिकार राखून ठेवल्याचे श्री. बारकुंड यांनी अधिसूचनेत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT