P. G. MP Dr. present at the new voter program in pharmacy. Heena village. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नवयुवकांनी मतदानाचा अधिकार बजावावा : डॉ. हीना गावित

आपल्या जीवनातील पहिले मतदान हे आयुष्यभर लक्षात राहणारे असते, म्हणून नवयुवकांनी मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन खासदार डॉ. हीना गावित यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : प्रत्येक नवमतदाराने आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा, मतदार हा लोकशाहीचा प्रमुख घटक असून, आपल्या जीवनातील पहिले मतदान हे आयुष्यभर लक्षात राहणारे असते, म्हणून नवयुवकांनी मतदानाचा अधिकार बजावावा, असे आवाहन खासदार डॉ. हीना गावित यांनी केले.

चौपाळे येथील पी. जी. कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल सायन्स ॲन्ड रिसर्च येथे भारतीय नवमतदाता संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. (Dr Heena gavit statement Young students should exercise their right to vote nandurbar news)

संस्थेचे अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, संस्थेचे संचालक सिद्धार्थ रघुवंशी, कार्यकारी अध्यक्ष रुद्रप्रताप रघुवंशी, जिल्हा भाजप महामंत्री सदानंद रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवमतदार कार्यक्रमप्रसंगी खासदार डॉ. हीना गावित यांनी भेट दिली.

त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले, की नंदुरबार ते मुंबई प्रवासाला रेल्वे नव्हती, पण माझ्या केंद्रीय पाठपुराव्याने खानदेश एक्स्प्रेस सुरू झाली पण आनंदाची गोष्ट अशी आहे की आजच्या घडीला तीन रेल्वेगाड्या मुंबईला जाण्यासाठी लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत.

तर मतदारसंघातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांशी हितगूज केले. महाविद्यालयाचा परिसर अतिशय सुंदर आहे. पी. जी. नॉलेज सिटी अनेक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. आदिवासीबहुल भागात शिक्षणाचे अनमोल कार्य करीत आहे.

भारत औषधनिर्माण क्षेत्रात जगात आज तिसऱ्या क्रमांकावर आहे. कॅन्सर, डायबेटिस यांसारख्या आजारांवरील औषधे पूर्वी खूप महाग होती.

सर्वसामान्यांना न परवडणारी होती. पंतप्रधान मोदी यांनी जनऔषधी केंद्र सुरू केल्यामुळे आज अनेक गरजू लोकांसाठी ते लाभदायक ठरत आहे. विविध निर्णयांमुळे मोदी युवा पिढीचे आवडते पंतप्रधान ठरले आहेत. भारतीय युवक हा प्रत्येक क्षेत्रात पारंगत आहे.

भाजप जिल्हाध्यक्ष नीलेश माळी, संतोष वसाईकर, कुशल चौधरी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्राचार्य डॉ. आर. ए. अहिरराव यांनी केला. कार्यक्रमाचे आयोजन गौरव रघुवंशी यांनी केले. प्रा. श्रीमती मानसी पटेल यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाला बी. व डी. फार्मसीचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी शेखर वसईकर, हितेश परदेशी, चंद्रशेखर पवार, गणेश माळी, योगेश बंजारा, सदाशिव माळी, हितेश पटेल, जुबेर बेलदार यांनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT