crime  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : दराणेतील डॉ. प्रेमसिंग गिरासे खून प्रकरणी ऐतिहासिक निकाल; दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : सोनगीर- दोंडाईचा मार्गावरील चिमठाणे (ता. शिंदखेडा) वीज उपकेंद्राजवळ सहा सप्टेंबर २०२१ ला दुपारी तीनला दराणे येथील डॉ. प्रेमसिंग राजेंद्रसिंग गिरासे या तरुणाचा खून झाला होता.

या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा यांनी दोन कलमांमध्ये दोन आरोपींना दुहेरी जन्मठेपेची शिक्षा देत ऐतिहासिक निकाल दिला. (Dr Prem Singh Girase murder case from Darna accused life imprisonment dhule crime news)

या खून प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. डॉ. प्रेमसिंग गिरासे या तरुणाचा खून झाल्यानंतर प्रक्षुब्ध जमाव नियंत्रणात येणे कठीण बनले होते. तत्कालीन पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी २४ तासांत आरोपींना अटक करेल, अन्यथा पोलिस सेवेचा राजीनामा देईल, अशी भावनिक भूमिका जाहीर केल्यावर जमाव नियंत्रणात आला होता.

श्री. पंडित यांच्या मार्गदर्शनाने चोवीस तासांत शिंदखेडा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनील भाबड यांनी तीन आरोपींना अटक केली होती. अतिरिक्त सरकारी वकील गणेश वाय. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत जिल्हा न्यायालयाने आरोपी श्‍याम युवराज मोरे (वय २६) व संदीप फुलचंद पवार (वय २५) यांना न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर अन्य एक संशयित राकेश रोहिदास मोरे याची निर्दोष मुक्तता केली.

खूनाचा गुन्हा दाखल

डॉ. प्रेमसिंग हा नवीन मोटरसायकल बजाज प्लॅटिना घेऊन दराणे येथे घरी जात होता. सोबत फिर्यादी जगदीश जयसिंग परमार व समाधान ईश्वरसिंग गिरासे होते. चिमठाणा वीज उपकेंद्राजवळ आरोपी श्‍याम मोरे व संदीप पवार याने डॉ. गिरासे व सहकाऱ्यांकडील नवीन दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न केला.

त्यात डॉ. प्रेमसिंग हा एकटा मोटारसायकलवर असल्याने आरोपींनी त्याच्या छातीसह हृदयाजवळ, उजव्या पायाच्या मांडीवर चाकूने हल्ला केला. त्याची दुचाकी व मोबाईल नेला. नंतर डॉ. प्रेमसिंग यास रूग्णालयात नेले असता मृत घोषित केले गेले. या प्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला.

१६ जणांच्या साक्षी

श्‍याम मोरे, राकेश मोरे व संदीप पवार, असे तीन संशयित निष्पन्न झाल्यावर चोरीतील मोटारसायकल, मोबाईल हस्तगत करण्यात आला. पोलिस निरीक्षक तथा तपास अधिकारी सुनील बी. भाबड यांनी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर सुनावणी सुरू झाली.

सरकार पक्षातर्फे फिर्यादी जगदीश परमार, दीपक बाविस्कर, बाळू धनगर, डॉ. साधना पाटील, समाधान गिरासे, मुकेश धनगर, योगेश दिलीपसिंग राजपूत, ईश्वर चव्हाण, नीलेश पाटील, हंसराज चौधरी, आशिष भामरे, जितेंद्र राजेंद्र पवार आणि सुनील भाबड, अशा १६ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.

विविध पुरावे ग्राह्य

याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. मात्र, साक्षीदार देवेंद्र विश्वासराव बोरसे व जगदीश विक्रम निकम या पंच साक्षीदारांसमक्ष दोन आरोपींनी स्वखुशीने निवेदन दिले. तपासात आरोपी श्‍याम याने डॉ. प्रेमसिंग याची नवीन दुचाकी व खुनासाठी वापरलेला चाकू काढून दिला. आरोपी संदीप याने मृताचा मोबाईल काढून दिला. तसेच आरोपींच्या कपड्यांवर रक्ताचे डाग मिळाले.

आरोपी श्‍याम याने काढून दिलेल्या चाकूवर मृत डॉ. प्रेमसिंग याच्या रक्ताचे डाग असल्याचे रासायनिक विश्लेषण अहवालात निष्पन्न झाले. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गणेश पाटील यांनी विविध पुराव्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा आधार घेतला व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी, असा युक्तिवाद केला.

आरोपींना अशी शिक्षा

जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. ख्वाजा यांनी ॲड. पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य मानत आरोपी श्‍याम व संदीप याला दोन कलमांन्वये दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. तसेच दहा हजार रुपयाचा दंड व तो न भरल्यास सहा महिन्यांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. तसेच मृत डॉ. प्रेमसिंग याच्या पालकांना नियमानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत पीडित नुकसान भरपाई देण्याबाबत आदेशितही केले.

''एकाच आरोपींना दोन वेगवेगळ्या कलमांखाली जन्मठेप ठोठावण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच शिक्षा आहे. आरोपींना भादवी कलम ३०२ व ३९४ प्रमाणे दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा आधार देत आरोपींना अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी बहुमोल मार्गदर्शन केले. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सुनील बाभड, पैरवी अधिकारी एल. आर. कदम यांचे सहकार्य लाभले.''- ॲड. गणेश वाय. पाटील अतिरिक्त सरकारी वकील, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Latest Maharashtra News Updates : मध्य वैतरणा धरणाचे तीन दरवाजे उघडले, लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

SCROLL FOR NEXT