during legislative session in Mumbai MLA Farooq Shah of started protest against local police officers at entrance of legislature dhule news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शाह यांचे पोलिसांविरुद्ध आंदोलन; उपमुख्यमंत्र्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशीचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

धुळे : मुंबईत विधिमंडळाचे मंगळवारी (ता. २१) अधिवेशन सुरू असताना धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी विधिमंडळाच्या प्रवेशद्वारात स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध ठिय्या आंदोलन सुरू केले. (during legislative session in Mumbai MLA Farooq Shah of started protest against local police officers at entrance of legislature dhule news)

ही माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात दिली. त्यावर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शाह यांच्या तक्रारीवर आयजी दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली. यानंतर आमदार शाह यांनी आंदोलन स्थगित केले.

आमदार शाह यांनी ठिय्या आंदोलनातून राज्य सरकारचे लक्ष वेधत विधिमंडळचा आजचा दिवस गाजविला. ते विधिमंडळाच्या पायरीवर धुळे येथील पोलिस अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करत होते. त्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आमदार शाह यांच्या आंदोलनाबाबत सभागृहात मुद्दा उपस्थित केला.

धुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट झाला आहे. पोलिस प्रशासनाचा कुठलाही वचक दिसून येत नाही. त्यामुळे आमदार शाह विधिमंडळाच्या पायरीवर उपोषण करत आहेत. त्यांच्या प्रश्नांचे तत्काळ निराकरण करण्यात यावे आणि सरकारतर्फे आमदार शाह यांना उपोषण सोडण्यास विनंती करावी, अशी मागणी श्री. पवार यांनी केली.

गृहमंत्र्यांची घोषणा

या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात सांगितले, की आमदार शाह यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत आयजी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करून सखोल चौकशी केली जाईल, जबाबदार असलेल्यांवर सक्त कारवाई केली जाईल.

हेही वाचा: झोप नीट लागायला हवी? मग हे वाचाच

या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार शाह यांची आंदोलनस्थळी भेट घेतली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार आमदार शाह यांनी आंदोलन स्थगित केले. विधिमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार रईस शेख, आमदार बच्चू कडू, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार विश्वजित कदम, आमदार नीलेश लंके, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी आमदार शाह यांची आंदोलनावेळी भेट घेतली.

शाह यांची तक्रार

आमदार शाह यांची तक्रार व मागणी अशी ः धुळे शहरात संवेदनशील ऐंशी फुटी रोड व वडजाई रोडवर पोलिस चौकी उभारण्यात यावी. दादा, भाईसारख्या गुंडांचे अड्डे उद्‌ध्वस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई व्हावी. चोऱ्या व घरफोड्यांची उकल होण्यासाठी विशेष पथक स्थापन करावे.

तपासातील चोऱ्या, घरफोड्या उघडकीस आणाव्यात. वेळोवेळी पत्रव्यवहारातून माहिती मागूनही पोलिस अधीक्षक संजय बारकुंड प्रतिसाद देत नाहीत. त्यांनी लोकप्रतिनिधींच्या हक्क व अधिकारावर गदा आणल्याने त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई व्हावी. चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंग, सट्टा, रनिंग मटका, झन्नामन्ना, जुगारासारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांना अभय देणाऱ्या, मलिदा लाटणाऱ्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी.

शहरातील नशेच्या गोळ्या व औषधांची विक्री रोखावी. त्यातील प्रमुख सूत्रधारांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी. आझादनगर पोलिस ठाणे हद्दीत राजस्थानहून तलवारी आणून विकणाऱ्या व देशी कट्टे बाळगणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध विशेष पथकामार्फत कडक कारवाई करावी, अशी मागणी पत्राद्वारे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री फडणवीस, विरोधी पक्षनेता पवार यांच्याकडे केल्याची माहिती आमदार शाह यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT