earthquake esakal
उत्तर महाराष्ट्र

Earthquake Update : म्हसावद परिसरात भूकंपाचे धक्के!

सकाळ वृत्तसेवा

शहादा (नंदुरबार) : तालुक्यातील म्हसावद व मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातील काही गावातील नागरिकांनी आज भूकंपाचे हलके धक्के जाणवल्याची माहिती आज (ता.१९) येथील तहसील प्रशासनास दिली. या धक्क्यामुळे घरातील भांडे पडल्याचा तसे संपूर्ण घरच हालल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. (Earthquake shocks in Mhasavad area nandurbar news)

याबाबत शहाद्याचे तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी १२: ५४ च्या सुमारास, बडवानी (मध्यप्रदेश) येथे केंद्रबिंदू असलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.८ एवढी नोंदविली गेली आहे.

कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही. दरम्यान शहादा तालुक्याच्या या सीमावर्ती भागात तसेच शहादा तालुक्यालाही अधूनमधून भूकंपाचे धक्के जाणवत असतात.

नर्मदा सरोवरामुळे या भागात भूगर्भात हालचाली होत असाव्यात असे या भागातील नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी याआधीही केला आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

सुरगाणा (जि. नाशिक) : गुजरातच्या सीमावर्ती भागात राशा, रघतविहीर, फणसपाडा येथे आज (ता.१९) चोवीस तासात तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या गावात शनिवारी (ता.१८) पहाटे २ वाजून २७ मिनिटांनी अर्धा मिनिटभर भूकंपाचा धक्का जाणवला.

दुसरा धक्का त्याच दिवशी दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी जाणवला. रविवारी (ता.१९) दुपारी साडेचारच्या दरम्यान स्फोट घडविल्यासारखा जोरात आवाज आला. अर्धा मिनिटभर चक्कर आल्यासारखे व गरगरल्यासारखे झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मांडणीवरील ठेवलेले भांडी पडल्याचे प्रत्येक कुटूंबाने सांगितले. आज झालेल्या आवाजाची तीव्रता अधिक जाणवली. दरम्यान तहसीलदारांनी भेट देत पाहणी केली न नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge: नवले पुलावरील अपघातांना बसणार आळा! लवकरच सुरू होणार नवा पर्यायी मार्ग; प्रवाशांना मोठा दिलासा

New Frog Species: नागालँडमध्ये बेडकाच्या नव्या प्रजातीचा शोध; पुण्यातील भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या शास्त्रज्ञांचा संशोधनात सहभाग

Petrol-Diesel-CNG Price: CNG महागल्यानंतर आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Team India Matches Today: वैभव सूर्यवंशी, रोहित शर्मा अन् स्मृती मानधना एकाच दिवशी मैदानात! केव्हा, कुठे रंगणार आज सामने; एका क्लिकवर वाचा

Suresh Borse Death Case : शिक्षक मृत्यू प्रकरणी PSIसह अंमलदार निलंबित; अटकेची प्रक्रिया सुरू; संशयितांना वाचवण्याचा होता प्रयत्न

SCROLL FOR NEXT