Abhinav Goyal, Sanjay Barkund, Nitin Gawande, Kishore Kale, Amita Dagde etc. were present along with the Muslim brothers who took a role of cooperation regarding the procession. esakal
उत्तर महाराष्ट्र

Anant Chaturdashi Eid : अनंत चतुर्दशीनंतर निघणार ईद- ए- मिलादची मिरवणूक; मुस्लिम बांधवांकडून सलोख्याचा संदेश

सकाळ वृत्तसेवा

Anant Chaturdashi Eid : अनंत चतुर्दशी आणि ईद- ए- मिलाद उत्सव एकाच दिवशी येत आहेत. या पार्श्वभूमीवर ईद- ए- मिलादची मिरवणूक जिल्ह्यात ग्रामीण भागातील इतर ठिकाणी २९ सप्टेंबर, तर धुळे शहरात ३० सप्टेंबरला काढण्याचा सकारात्मक निर्णय घेत मुस्लिमबांधवांनी सलोखा, एकात्मता जोपासण्याचा संदेश दिला.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ईद- ए- मिलादच्या मिरवणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आढावा बैठक झाली. (Eid-e-Milad procession will leave after Anant Chaturdashi dhule news)

जिल्हाधिकारी अभिनव गोयल अध्यक्षस्थानी होते. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, महापालिका आयुक्त अमिता दगडे- पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सकारात्मक निर्णय

गणेशोत्सवात यंदा गुरुवारी म्हणजेच २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. तसेच ईद- ए- मिलाद सण आहे. हे दोन्ही सण- उत्सव एकाच दिवशी येत असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहाण्यासाठी अनंत चतुर्थीऐवजी ईद- ए- मिलादची मिरवणूक एक किंवा दोन दिवसांनी काढावी, अशी सूचनावजा अपेक्षा जिल्हा प्रशासनातर्फे सिरत कमिटीच्या सदस्यांसह बैठकीस उपस्थित मुस्लीमबांधवांकडे व्यक्त करण्यात आली.

याबाबत उपस्थित मुस्लीमबांधवांनी प्रशासनाशी सविस्तर चर्चा केली. चर्चेअंती धुळे शहरातील ईद- ए- मिलादची मिरवणूक शनिवारी (ता. ३०) काढण्याचा निर्णय घेण्यात आला. याव्यतिरीक्त जिल्ह्यातील इतर ठिकाणी निघणाऱ्या मिरवणुका शुक्रवारी (ता. २९) काढण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मिरणुकांबाबत सूचना

मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मिरवणुकांमध्ये मोठ्या काठ्यांव्दारे झेंडे फिरविले जाणार नाहीत. काही अक्षेपार्ह घोषणाबाजी अगर हावभाव, आरडाओरड करण्यात येणार नाही. याबाबत काळजी घेवून येणारे सण, उत्सव शांततेने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी केले.

जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, मुख्याधिकारी तसेच पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील सिरत कमिटीचे सदस्य, मुस्लिम धर्मगुरु, मौलाना, मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठीत नागरीक, नगरसेवक, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

गणेश मंडळांना आवाहन

तत्पूर्वी, गणेशोत्सवानिमित्त झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी गोयल यांनी एक गाव- एक गणपती या संकल्पनेनुसार गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन गणेश मंडळांना केले.

जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळानी तसेच प्रत्येक गावात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेनुसार यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा, सार्वजनिक शांततेसह जिल्हा व पोलिस प्रशासनाला कायदा- सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT