उत्तर महाराष्ट्र

८ हजार कोटींचे ‘मार्केट’ शेतकऱ्यांच्या हाती

महेंद्र महाजन

नाशिक - द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आठ हजार कोटींचे द्राक्ष मार्केट स्वत:च्या हातात ठेवण्याचा निर्धार केला आहे. या व्यापारपेठेवर आतापर्यंत केवळ व्यापाऱ्यांचीच मक्तेदारी होती त्यामुळे बळीराजाला दरवर्षी २५० कोटी रूपयांच्या फसवणुकीस सामोरे जावे लागत होते. तसेच शेतकऱ्यांनाही केवळ देशांतर्गत आणि परदेशातील बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या भावातून मिळणाऱ्या पैशांवरच समाधान मानावे लागत होते.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यास कृषी विभागाने साथ देण्याचे ठरवले आहे. कृषी विभागातर्फे ‘मॅन्युअली’ गावनिहाय द्राक्षांच्या वाणांसह क्षेत्राचे संकलन करून ‘ॲप’ विकसित करण्याचे ठरवण्यात आले आहे. सध्या जागतिकस्तरावर नेमक्‍या कोणत्या वाणाला आणि किती मागणी आहे याची माहिती सर्वदूर शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे छाटणीच्या वेळापत्रकापासून ते वाणाच्या निवडीपर्यंतची शिस्त राहिलेली नाही. हे कमी म्हणून की काय या हंगामात एकदम द्राक्षे बाजारात येताच, भाव कोसळतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. शिवाय किलोला २८ ते ३० रुपये भाव मिळालेली द्राक्षे ही ५० ते ६० रुपये किलोने विकलेल्या द्राक्षांसमवेत देशातंर्गत आणि परदेशातील बाजारपेठांमध्ये पोचतात.  युरोप आणि इंग्लंडमधील ‘सुपर मार्केट’मध्ये कमी भावाने घेतलेल्या द्राक्षांची व्यापाऱ्यांनी ‘ऑफर’ दिली आणि भाव कोसळल्याची घटना घडली होती. 

‘सुपर मार्केट’चा दणका
युरोप आणि इंग्लंडमधील ‘सुपर मार्केट’मध्ये पाच किलो द्राक्षांना १० युरो भाव मिळणे अपेक्षित होते. पण आठवड्याला ७०० कंटेनर खपणाऱ्या बाजारपेठेत १ हजार कंटेनर पोचले आणि त्यात कमी भावाच्या द्राक्षांचा समावेश असल्याने भाव निम्म्याने गडगडले होते.

शेतकऱ्यांच्या एकत्रीकरणातून फसवणुकीला आळा बसणार आहे. याशिवाय रशियाची निर्यात बंद झाल्याची आवई उठवत कमी भावाने द्राक्षे खरेदी करण्याच्या व्यापारी वृत्तीला लगाम बसणार नाही.
- कैलास भोसले, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार महासंघ 

द्राक्ष शेती
१५ हजार कोटी - शेतकऱ्यांचा व्यवसाय 
२ हजार ५०० कोटी - देशातून होणारी निर्यात  
३ लाख ५० हजार एकर  - राज्यातील एकूण क्षेत्र
१ लाख ७५ हजार एकर - नाशिक जिल्ह्यातील क्षेत्र 
२ हजार कोटी रुपयांची - नाशिक जिल्ह्यातून निर्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT