Servants carrying out cleanliness drive by Sant Nirankari Mandal in Dhule Panjra river basin  esakal
उत्तर महाराष्ट्र

Amrit Project : ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’; संत निरंकारी मंडळातर्फे पांझरा नदीतून 8 ट्रॅक्टर कचरा संकलन!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील संत निरंकारी मंडळातर्फे ‘अमृत प्रोजेक्ट’अंतर्गत पांझरा नदीपात्रात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.(Eight tractors collecting garbage from Panjra river by Amrit Project Sant Nirankari Mandal Dhule News)

यात आठ ट्रॅक्टर कचरा संकलित करण्यात आला. या अभियानास महापालिकेचे सहकार्य लाभले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सद्‌गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या हस्ते यमुना नदीच्या छट घाटावर अमृत परियोजनेंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियान सुरू झाले.

देशातील २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये एकाच वेळी अभियान राबविणे सुरू झाले. बाबा हरदेवसिंहजींच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेत सद्‍गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशनानुसार ‘अमृत परियोजने’चे आयोजन करण्यात आले.

पांझरा पात्रात अभियान

माता सुदीक्षाजी महाराज यांनी पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व समजावून ईश्वराने दिलेल्या अमृतरूपी निर्मल जलचा सांभाळ करणे कर्तव्याचा भाग असल्याचे सांगितले. पाण्यासोबत मन निर्मळ ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

या पार्श्वभूमीवर संत निरंकारी मंडळाचे सचिव जोगिंदर सुखिजा यांनी सांगितले,की अमृत परियोजनेंतर्गत धुळे क्षेत्रीय प्रभारी हिरालाल पाटील यांच्या नेतृत्वात धुळे शहारातील पांझरा नदी परिसरात अभियान राबविण्यात आले. श्री कालिकामाता मंदिर ते लहान पुलापर्यंतच्या नदीपात्रात स्वच्छता करण्यात आली. यात सरासरी आठ ट्रॅक्टर कचरा संकलित झाला. महापालिकेतर्फे घंटागाडीची (ट्रॅक्टर) व्यवस्था करण्यात आली.

सेवकांचा उत्स्फूर्त सहभाग

येथील अभियानात एसएनसीएफ सदस्य, सेवा दल अधिकारी डॉ. अनिल कानडे, मिलिंद बाविस्कर व महिला, पुरुष सेवा दल सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. युवकांचा सक्रिय सहभाग होता. यात पर्यावरणपूरक उपकरणांचाच वापर झाला.

पार्किंग व मेडिकल सुविधा उपलब्ध होत्या. जलाशयाबाबत देण्यात आलेल्या निर्देशांचे यथोचित पालन करण्यात आले. मान्यवरांनी अभियान कार्याचा गौरव केला. संकटापासून बचावासाठी जलसंरक्षण व जलाशयांची स्वच्छता या अभियानाबाबत सद्‍गुरू माताजींचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकार उलथवेन...मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा..

Karad fire Accident: पुणे- बंगळूर महामार्गावर ढेबेवाडी फाट्यावर ई-बाईक खाक; चालक दुचाकी रस्त्याकडेला लावून दूर

Latest Marathi News Updates: गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" घोषित

हो, मी डेट करतेय... घटस्फोट अन् ब्रेकअपनंतर रुपाली भोसले पुन्हा प्रेमात! म्हणाली, 'जो माझ्या आयुष्यात येईल त्याला...

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

SCROLL FOR NEXT