horses market esakal
उत्तर महाराष्ट्र

Sarangkheda Yatra : सारंगखेड्यात उद्यापासून एकमुखी दत्ताचा यात्रोत्सव

जातिवंत घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील एकमुखी दत्ताच्या यात्रेला सोमवारपासून (ता.२५) सुरवात होत असून यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sarangkheda Yatra : जातिवंत घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या येथील एकमुखी दत्ताच्या यात्रेला सोमवारपासून (ता.२५) सुरवात होत असून यात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे.

उद्या (ता.२५) श्री दत्त प्रभूंचा पालखी सोहळा होणार आहे. २६ डिसेंबरपासून यात्रेला प्रारंभ होणार असून दत्त मंदिर ट्रस्टतर्फे नियोजन पूर्णत्वास आले आहे.(Ekmukhi Datta yatrotsav from tomorrow in Sarangkheda nandurbar news)

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या व महानुभाव पंथीयांचे पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारंगखेडा येथील एकमुखी दत्तप्रभूच्या यात्रोत्सवाला सुमारे ४०० वर्षांची परंपरा आहे. यात्रेत भाविक नवस बोलतात व नवस पूर्ण झाल्यावर तुलेचा नवस उतरवण्याची परंपरा आहे. या परंपरेत केळी, साखर, गूळ, फळे, पैशांचे नाणे आदींची तुला करून नवस फेडले जातात.

महानुभाव अनुयायांबरोबर राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. यात्रोत्सवाला २६ डिसेंबरपासून सुरवात होणार असून या पार्श्वभूमीवर दत्त मंदिरट्रस्टतर्फे भाविकांच्या सुरक्षा, दर्शन व्यवस्था सुव्यवस्थित व्हावी म्हणून उपाययोजना करण्यात आली आहे. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शन व्यवस्थेसाठी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.

अनुचित प्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी गर्भगृहासह मंदिर परिसरात १२ सीसीटीव्ही कॅमे-यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे. मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे. श्री दत्तात्रेय प्रभू महाराजांची पूजा अर्चा, महाआरती, श्री पंचावतार उपहार व भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येईल. मूर्तीला अभिषेक, श्री मूर्तीस गंध अक्षता, फलहार, वस्त्र

समर्पण, विडा अवसर व रात्री महाआरती होऊन आठपासून श्रीमूर्तीची शोभायात्रा काढली जाणार आहे, अशी माहिती दत्त मंदिर ट्रस्टचे सचिव भिकन पाटील यांनी दिली. पालखी सोहळा २५ डिसेंबरला होणार आहे. पालखी सोहळा व जन्मोत्सव साजरी होणाऱ्या जागेवर भव्य मंच उभारला आहे.

परममहंत आचार्य वयन सविता अलंकृत श्री भास्कर बाबाजी महानुभाव शहादा व परिसरातील संत-महंत, आचार्य, मुनी, भिक्षुक, तपस्विनी, महानुभाव पंथीय अनुयायी यांच्यासह इतर मान्यवर व भाविकांच्या उपस्थितीत सोहळा होणार आहे. दत्तप्रभूच्या पालखीची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे.

१११ घोड्यांची झाली विक्री

सारंगखेडा येथील प्रसिद्ध अश्‍व बाजारात विविध प्रजातींच्या व प्रांतातील सुमारे दोन हजार ७०० घोड्यांची आवक झाली असून, रविवारी (ता. २४) दिवसभरात ६८ घोड्यांच्या विक्रीतून २३ लाख १६ हजारांची उलाढाल झाली आहे.

सर्वाधिक तीन लाख ५१ हजारांचा घोडा बाबू सटीक अहेमद (रिछा कसबा, उत्तर प्रदेश) यांनी रवींद्र राजेंद्र दुलगंज (बोरिवली, मुंबई) यांना विकल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली. अश्व बाजारात आतापर्यंत १११ घोड्यांची विक्री झाली असून, ४० लाख ३६ हजार १०० रुपयांची उलाढाल झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT