Assistant Police Inspector Ganesh Phad and colleagues arrested the power pump thieves. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime: सोनगीरसह परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वीजपंप चोरट्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime : येथील पोलिसांनी शेतविहिरीतील वीजपंप (जलपरी) चोरणाऱ्या दोन संशयितांना पकडले असून, चोरटे व चोरीचा माल घेणाऱ्यांची मोठी टोळी जेरबंद होण्याची शक्यता आहे.

शनिवारी (ता. ५) चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. सोनगीर व परिसरात शेतीपंप चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले होते. (Electric pump thieves in Songir arrested Dhule Crime)

कावठी (ता. धुळे) येथील गजेंद्र सुकलाल शिंदे यांच्या शेतातील तसेच शेजारील तीन शेतकऱ्यांच्या विहिरीतील वीजपंप चोरीस गेल्याने येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपास सुरू असताना नेर (ता. धुळे) येथून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत गोंदूर (ता. धुळे) येथील तीन संशयितांची नावे पुढे आली. त्यांना ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली असता संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एक वीजपंप (जलपरी), दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.

संशयितांनी काही जलपऱ्या धुळे मोगलाईतील भंगार व्यापारी इमरान शेख रऊफ यास विक्री केल्याचे सांगितले. त्याच्याकडून मागील गुन्ह्यातील चार वीजपंप ताब्यात घेण्यात आले. सर्व पाच वीजपंपांची किंमत सुमारे ३२ हजार रुपये आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

संशयित वासुदेव प्रकाश भिल (वय ३०) व राम गुलाब पवार (१९, दोघे रा. नगाव रोड, भिलाटी गोंदूर, ता. धुळे) यांना अटक करण्यात आली. दोघांनी आकाश विकास पवार (रा. गोंदूर) याच्या मदतीने कावठी, मेहेरगाव, सैताळे, चिंचवार, गोंदूर, मोराणे आदी शिवारातून अनेक वीजपंप चोरी केल्याचे सांगितले.

दोन्ही संशयितांना अटक होऊन दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर झाली. इतर तीन संशयित विधिसंघर्षित बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश फड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक किरण राजपूत, पोलिस नाईक राहुल सानप, सूरज सावळे, उन्मेश आळदे, अमरिश सानप यांनी कारवाईत सहभाग घेतला. सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र राठोड तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT