elephant disease
elephant disease esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : हत्तीरोग रुग्ण शोध मोहीम सुरू

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात १६ ते ३१ ऑगस्टपर्यंत हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी हत्तीरोग रुग्ण शोध मोहीम आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी दिली.

हत्तीरोग बुचेरेरिया बॅन क्रॉफ्टी या परोजपजीवी जंतूमुळे होणारा आजार आहे. या आजाराचा प्रसार क्यूलेक्स प्रकारच्या डासामुळे होतो. दूषित व्यक्तींच्या शरीरातील हत्तीरोगाचे जंतू डासामार्फत निरोगी व्यक्तींच्या शरीरात प्रवेश करतात.

या रोगामुळे रुग्णाचा मृत्यू होत नसून हातापायावर अथवा जननेंद्रियावर सूज येऊन विद्रुपता आल्यामुळे शरीर विकृत दिसते. परिणामी, विनाउपचारीत अथवा अर्ध उपचारीत रुग्ण हत्तीरोग प्रसारासाठी कारणीभूत ठरतो. यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध हा नेहमीच चांगला असतो. (Elephant disease patient search campaign launched Nandurbar latest Marathi news)

हत्तीरोग आजाराची लक्षणे

जंतू शरीरात प्रवेश केल्यानंतर त्यांची वाढ व विकास सुरू होतो. लसीकाग्रंथी सुजतात. वेदना होऊन रुग्णास ताप येतो. या आजाराचे निदान इओसिनोफिलिया, लसीकाग्रंथी सूज, पॉझिटिव्ह इंट्राडर्मल टेस्टवरून करता येते.

लक्षणविरहित अवस्थेत रक्ताच्या रात्रकालीन तपासणीत रोग जंतूच्या सूक्ष्म अळ्या दिसतात. मात्र, रोगाची कोणतीही लक्षणे व चिन्हे दिसत नाहीत. तीव्र लक्षण अवस्थेमध्ये ताप, लसीकाग्रंथी दाह व सूज, तसेच पुरुषांमध्ये वृषणदाह आदी लक्षणे दिसून येतात. तर दीर्घकालीन संसर्ग अवस्थेत हात पाय व बाह्य जननेद्रिंयावर सूज, हायड्रोसिल, काइलोयुरिया आदी लक्षणे

दिसतात. हत्तीरोगाच्या नियंत्रणासाठी आपले घर व घराजवळचा परिसर स्वच्छ ठेवावा. गावाच्या किंवा घराभोवताली असणारी डबकी, खड्डे बुजवावेत. गटार वाहती करावी. इमारतीच्या टाक्या, हौद यांना घट्ट झाकणे बसवावेत किंवा घट्ट कापड बांधावे, पाण्याच्या साठ्यांची झाकणे नेहमी बंद ठेवावेत.

फ्रीज, कुलर, कुंड्या, डबे व अन्य वस्तुंमध्ये पाच दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी साठून राहणार नाही, याजी काळजी घ्यावी. कारण अशा पाण्याच्या साठ्यांमध्ये डासांची पैदास होते. रात्री झोपताना कीटकनाशक भारीत मच्छरदाणीचा वापर करावा. डास प्रतिबंधक साधनांचा वापर करावा. डासाच्या पैदासस्थळी अळीनाशक ऑईल, रॉकेल, तेलाची, कीटकनाशकाची फवारणी करावी. हत्तीरोग नियंत्रणासाठी जनतेचा सहभाग आवश्यक असल्याने सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर प्रकरणातील अटकेतील डॉक्टरांच्या अडचणी वाढणार? पोलिसांकडून डॉ. तावरेसह हाळनोरच्या निलंबनाचा प्रस्ताव

Rishabh Pant: 'एअरपोर्टवरही जात नव्हतो, कारण...' टी20 वर्ल्ड कप खेळण्यापूर्वी पंतने सांगितला अपघातानंतरचा अनुभव

Pune Porsche Car Accident: कल्याणीनगर अपघातातील आरोपीला मद्य देणाऱ्या कोझी व ब्लॅकच्या मालकांसह इतरांचे जामिनासाठी अर्ज; उद्या सुनावणी

Fact Check: कंगणा राणौतचा अबू सालेमसोबत फोटो व्हायरल झाल्याचा 'तो' दावा खोटा

Pune Porsche Car Accident: बालसुधारगृहात असलेल्या अल्पवयीन आरोपीचा 'असा' आहे दिनक्रम; पहाटे उठून करावी लागते प्रार्थना अन्...

SCROLL FOR NEXT