Engineer arrested while accepting bribe of 20 thousand in Shahada nandurbar news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Bribe Crime : शहाद्यात 20 हजारांची लाच घेताना अभियंत्याला अटक; लघुपाटबंधारेतील बिलासाठी घेतली रक्कम

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Bribe Crime : लघुपाटबंधारे विभागात केलेल्या तीन कामांची बिले काढण्यासाठी २० हजारांची लाच मागून १९ हजार ५०० रुपये स्वीकारताना शहादा पंचायत समितीचा कनिष्ठ अभियंता तथा उपविभागीय जलसंधारण अधिकाऱ्याचा पदभार असलेल्या दिनेश केशवराव पाटील याला सोमवारी (ता. २५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. (Engineer arrested while accepting bribe of 20 thousand in Shahada nandurbar news)

तक्रारदारांनी २०२२ मध्ये जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत शहादा तालुक्यात एकूण तीन कामे पूर्ण केली आहेत. तिन्ही कामांची बिले काढून दिल्याच्या मोबदल्यात कनिष्ठ अभियंता दिनेश पाटील याने तक्रारदार यांच्याकडून एकूण ९५ हजार रुपयांची मागणी केली होती. यापैकी वेळोवेळी ७५ हजार रुपये एवढी रक्कम तक्रारदाराकडून याआधीच घेतली आहे.

उर्वरित २० हजार रुपयांसाठी पाटील याने तक्रारदाराकडे तगादा लावला होता. पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीदरम्यान तडजोडीअंती १९ हजार ५०० रुपये एवढी रक्कम त्याने स्वीकारण्याची तयारी दर्शविली होती.

पाटीलला सोमवारी जिल्हा परिषदेच्या नंदुरबार येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ तक्रारदाराकडून १९ हजार ५०० रुपये एवढी रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक माधवी वाघ, पोलिस हवालदार विलास पाटील, अमोल मराठे, देवराम गावित, महिला पोलिस हवालदार ज्योती पाटील, पोलिस नाईक संदीप नावाडेकर, मनोज अहिरे यांच्या पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT