A couple from Erandol during Kanubai Pooja at Borsevady esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: धीरे धीरे सप्पनमा ये जो व कानबाई-रानबाई! कानुमातेच्या उत्सवाचा उत्साह अमाप

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : खानदेशात कानुबाईमातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या उत्सवासाठी प्रत्येक गावातील लांबवर गेलेले चाकरमानीही दाखल झाले आहेत. सायंकाळी कानुमातेच्या पूजनासाठी भावकीतील मंडळींनी मोठी गर्दी गेली होती.

शनिवारी भाजी-भाकरीच्या आणि रविवारी (ता. २०) पुरणपोळीच्या रोटाने पूजन झाले. ‘धीरे धीरे सप्पनमा ये जो व कानबाई-रानबाई’ आदी गीते गात रात्रभर जागरण झाले. सोमवारी (ता. २१) सकाळी कानुमातेची विसर्जन मिरवणूक निघेल. (excitement of festival of Kanumata immeasurable Dhule News)

कानुमातेचे पूजन प्रत्येक भावकीत पारंपरिक पद्धतीने झाले. कानुमाता असलेल्या घरी पूजन करण्यासाठी वाजतगाजत रोट घेऊन येणाऱ्या दांपत्यांमध्ये भक्तिभाव ओसंडून वाहत होता.

महिला वर्ग तर कानुमातेच्या पूजनासाठी रोट करण्यासाठी दिवसभर व्यस्त होत्या. रात्री मातेचे पारंपरिक गीत गात जागरण झाले. येथील कानुमाता मंडळाचे अध्यक्ष गजू माळी, साहेबराव माळी व शांताराम माळी यांचे विविध जागरण भजन झाले.

पावसासाठी मातेला साकडे

दरम्यान, तीनदिवसीय उत्सवाची सोमवारी सांगता होईल. मिरवणुकीत आबालवृद्ध फुगडी खेळून उत्सवाचा आनंद द्विगुणित करतील. या वर्षी पावसाने दडी मारल्याने पावसासाठी मातेला साकडे घालतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT