Experiment with the field and make progress 
उत्तर महाराष्ट्र

शेतीत नवनवीन प्रयोग करा अन् प्रगती साधा

सकाळ वृत्तसेवा

निमगूळः शेतकऱ्यांनी निसर्गावर विसंबून न राहता शेतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजे. आजच्या तरुणांनी शेतीत लक्ष घालून प्रगती साधावी. अद्ययावत शेती करून समूहातून प्रक्रिया उद्योग उभे केल्यास शेती फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार सरकारसाहेब रावल यांनी केले.

परिसरातील शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक विचारविनिमय व चर्चासत्र दोंडाईचातील रावल फार्म हाऊसवर नुकतेच झाले. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. चर्चासत्रात समूह शेती, अद्ययावत शेती, जमिनीची पोत सुधारण्यासाठी कोणते खत वापरावे, मजूरटंचाई, फवारणी, ठिबकसिंचन, शेततळे याबाबत सविस्तर चर्चा केली.

शेतकऱ्यांनी किमान आठ तास शेतीला दिले, नियोजनातून शेती केल्यास चांगली प्रगती होऊ शकते. भाजीपाला चांगल्या प्रतीचा पिकविल्यास दर चांगला मिळतो, तोटा सहन करावा लागत नाही; परंतु आजचा शेतकरी नियोजनात कमी पडत असल्याचे श्री. रावल यांनी सांगितले. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष हितगूज साधत शंकांचे निरसन केले. "सकाळ-ऍग्रोवन'चे नियमित वाचन केल्यास त्यातून शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळून शकते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती रघुवीर बागल यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

समूह शेतीस प्राधान्य द्या
शेतकऱ्यांनी संघटित होऊन फवारणी मशिन, दोन तीन ट्रॅक्टर, दोन तीन कुटी मशिन, कंपोस्ट खत प्रक्रिया ,सेंद्रिय खत प्रक्रिया, असे प्रकार समूहाने केल्यास वेळेची व पैशांची बचत होऊ शकते. त्यामुळे समूह शेतीस प्राधान्य द्यावे, असे श्री. रावल यांनी सांगितले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli Fire: कैलास लस्सीच्या दुकानाला आग! कर्मचाऱ्यांनी खिडकीतून मारल्या उड्या; Video Viral

Mumbai Rains: मुसळधार पाऊस व भरतीचा तडाखा: वसई-नालासोपारा-विरार रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या ठप्प

Crime News: विजेचे झटके अन् गरम सळीने चटके दिले, नंतर स्क्रू ड्रायव्हरने गुप्तांगात...; तरुणासोबत अमानवी कृत्य, कारण काय?

Ayurvedic Remedies for Fever: पावसात भिजल्यानंतर ताप आलाय? 'हे' आयुर्वेदिक घरगुती उपाय केले तर लगेच मिळेल आराम

Latest Marathi News Live Update : इंडोनेशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भव्य स्वागत केले

SCROLL FOR NEXT