Government Schemes
Government Schemes esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नागरिकांसाठी योजनांची जत्रा; कार्यालयांचा फेरा वाचणार

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : तालुक्यातील सर्व नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा व नागरिकांना एकाच छताखाली सर्व योजना उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यात मंडळनिहाय ‘जत्रा शासकीय योजनांची; सर्वसामान्यांच्या विकासाची’ ही योजना ६ जूनपासून राबविण्यात येणार आहे.

या माध्यमातून नागरिकांना माराव्या लागणाऱ्या फेऱ्या काही अंशी थांबणार आहेत. (Fair of Schemes for Citizens round of offices will be read Dhadgaon Taluka Board wise program will be implemented by administration Nandurbar News)

नागरिकांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विविध घटकातून विकास साधता यावा, त्यांच्या योजनांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शासनाने जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित केल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे.

याअंतर्गत एकाच छताखाली सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी धडगाव तालुक्यात ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्वसामान्यांच्या विकासाची’ योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना मंडळनिहाय तीन टप्प्यांत राबविण्यासाठी शासनाने नियोजन केले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हा उपक्रम काकडदा, सिसा व धडगाव येथे होणार असून, यासाठी संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार ए. जे. वळवी, महसूलचे नायब तहसीलदार पी. एम. पानपाटील, अव्वल कारकून व्ही. एच. धनगर, एल. एम. चव्हाण, एम. बी. सूर्यवंशी, अजय पावरा, एम. एन. वसावे, एस. ए. पाठक, एस. के. नाईक, एन. बी. शिंदे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे, अशी माहिती प्रभारी तहसीलदार किसन गावित यांनी दिली.

लोकाभिमुख योजना

शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची, सर्व सामान्यांच्या विकासाची’ हे अभियान धडगाव तालुक्यात राबविण्यात येत आहे.

अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचा लाभ देणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT