Crime news
Crime news esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar : विविध 83 वाहनांची बनावट नोंदणी

धनराज माळी

नंदुरबार : येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (Sub Regional Transport Office) तांत्रिक यंत्रणा हॅक (Technical Mechanism Hack) करीत या कार्यालयामार्फत ८३ विविध प्रकारच्या वाहनांची बनावट (Fake) नोंदणी करून ६६ लाख ६० हजाराचा महसुलला भामट्यांनी चुना लावला आहे. नागपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात नंदुरबार जिल्ह्यातील एक वाहन ट्रान्स्फर करण्यासाठी गेले असता तेथील लिपिक यांना त्या वाहनाच्या आरसी बुकबाबत शंका आल्याने त्यांनी त्या वाहनाबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय , नंदुरबार येथे चौकशी केली असता ते वाहन क्रमांक निवडक / आकर्षक ( व्हीआयपी) श्रेणीतले असल्याचे आढळून आले. तसेच त्या क्रमांकावर कोणतेही वाहन क्रमांकाचे रजिस्ट्रेशन (Fake Registration) झालेले नसल्याचे दिसून आले. (Fake registration of 83 different vehicles nandurbar crime news)

नंदुरबार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अभिलेख संबंधित लिपिक श्री. बागूल यांनी तपासले असता कोणीतरी बनावट आरसी बुक बनविल्याचे तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील शिल्लक असलेले निवडक / आकर्षक क्रमांकाचा वापर करीत असल्याचे निदर्शनास आले. तसेच हस्तलिखित अभिलेखावर नोंदी नसलेले ८३ निवडक/आकर्षक वाहन क्रमांकाबाबत धक्कादायक माहिती समोर आली. सदर वाहन पोर्टलवरील बॅकलॉग साइटवर पाहणी केली असता ते वाहन क्रमांक रजिस्ट्रेशन असल्याचे दिसून आले. त्यामुळे लिपिक श्री. बागूल यांनी तत्काळ सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांना माहिती दिली. श्री. बीडकर यांनी पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांची भेट घेत माहिती दिली.

नंदुरबार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. श्री. कळमकर यांनी चौकशी केली असता हस्तलिखित अभिलेखावर नोंदी नसलेले ८३ निवडक/आकर्षक वाहन क्रमांक हे इतर वाहनांना वापरून तसेच शासनाला कोणताही टॅक्स न भरता ते वाहन रजिस्टर केल्याचे दाखविले. तसेच विविध कंपनीच्या विविध मॉडेलच्या ८३ वाहनांच्या इंजिन नंबर किंवा चेसिस नंबरमध्ये खाडाखोड करुन शिवाय बनावट आरसी बुक तयार करुन शासनाची अंदाजित ६६ लाख ५९ हजार ९०० रुपयाची फसवणूक केली. ८३ वाहन धारक, एजंट, तसेच इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात सहभाग असणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल ,असा विश्‍वास जिल्हा पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT