suicide  esakal
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव (जि. जळगाव) : बॅंकेच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील टाकळी प्र.दे. येथे शुक्रवार, २७ रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त, योगेश दिलीप पवार (वय-४०) रा. टाकळी प्र.दे ता. चाळीसगाव याने बॅंकेच्या कर्जाला कंटाळून आंबा फाटा जधळील मन्याड डॅम येथे विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार, २७ रोजी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. गावातील भाऊसाहेब हिम्मत पवार, कैलास बाबुराव देवरे, दिलीप उत्तम पवार यांना योगेश बेशुद्ध अवस्थेत मिळून आला. त्याअगोदर योगेशचा मृत्यू झाला होता. तेव्हा योगेशच्या मृतदेहाला वरील गावकऱ्यांनी खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केला.

त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. योगेशच्या पाश्चात्य पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. पवार कुटुंबाच्या घरात अगोदरच विश्व दारिद्री आहे. घरातील कर्ता पुरुषच काळाच्या पडद्याआड गेल्याने गावासह परिसर सुन्न झाला आहे. तत्पूर्वी या घटनेबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याबाबत मेहूणबारे पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : चंपत राय यांच्यासह इतर विश्वस्तांवर काय कारवाई केली जाणार आहे? - विजय वडेट्टीवार

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

Karnataka SIR Campaign : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक राहत होते कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान धक्कादायक प्रकार उघड, 'त्या' कुटुंबाचं दुबई कनेक्शन काय?

SCROLL FOR NEXT