Farmer esakal
उत्तर महाराष्ट्र

धुळे : गळफासासाठी दोरी घेऊन शेतकरी कलेक्टर ऑफिसला

अधिकारी पूरक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करीत आहेत अशी त्यांची तक्रार आहे.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शेतजमीनप्रश्‍नी मागणी केलेले कागदपत्र देण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने भोरटेक (ता. शिरपूर) येथील ७१ वर्षीय शेतकरी योगराज रामदास पाटील थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गळफास घेण्यासाठी दोरी घेऊन आले. त्यामुळे खळबळ उडाली. त्यांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांविषयी तक्रार करायची होती. त्यांनी ती केली. (Latest Marathi News)


थाळनेर (ता. शिरपूर) शिवारातील एका गटात ३६ एकर दहा गुंठे जमीन आहे. तिचे उतारे दिले जात नाहीत. तरीही शेतजमिनी मोजणी झाली, त्यापेक्षा जास्त प्रमाणात दुसऱ्यास उपलब्ध करून देण्यात आल्याची शेतकरी पाटील यांची तक्रार आहे. त्याबाबत मागणी करूनही संबंधित अधिकारी पूरक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करीत आहेत. या जमीन क्षेत्रात त्यांचे वडील (स्व.) रामदास पाटील- जाधव (भोरटेक) यांच्या नावे हिश्‍याची ०.८५ आर जमीन आहे. त्यात ०.४५ आर शेतजमीन दिलेली आहे, असे खोटे कागदपत्र करून माझे नुकसान केल्याची शेतकरी पाटील यांची तक्रार आहे. या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने त्यांनी गळफास घेण्यासाठी दोरी आणून जिल्हाधिकारी कार्यालयात दाद मागण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atpadi Pomegranate Market : आटपाडी बाजारात 6,780 क्रेट डाळिंबाची विक्रमी आवक; प्रतिकिलो 100 ते 171 रुपयांचा मिळाला दर, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Satara Heavy Rain : सातारा जिल्ह्यात जिल्‍ह्यात सर्वदूर पाऊस; पावसाने ठिकठिकाणी दरडी कोसळल्या, काही रस्ते वाहतुकीस बंद

Latest Marathi Live Update: कोंढव्यात रस्ते खोदकामामुळे भीषण वाहतूक कोंडी

Where is Cabo Varde? मेस्सी अन् अर्जेंटिनाची झोप उडवणारा केप व्हर्दे कुठेय माहित्येय? ५ लाख लोकसंख्या, दहा बेटांचा एक देश, जो नकाशात शोधूनही सापडत नाही...

Ambernath: काय हा निर्लज्जपणा! भ्रष्टाचार करा पण अति नको; उपनगराध्यक्षाचं सभागृहातच विधान, नगरसेवक दात काढून हसले

SCROLL FOR NEXT