Farmers discussing electricity problems with junior engineer Yogesh Khairnar at the power sub-centre here.
Farmers discussing electricity problems with junior engineer Yogesh Khairnar at the power sub-centre here. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शेती पंपाचा विज पुरवठा खंडित केला जात असल्याने शेतकरी संतप्त

सकाळ वृत्तसेवा

म्हसदी (जि.धुळे) : म्हसदीसह परिसरात वीज बिल थकल्याने रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बंद करण्याची धडक मोहीम सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर परिसरातील त्रस्त शेतकऱ्यांनी (Farmer) कनिष्ठ अभियंत्यांची भेट घेत संताप व्यक्त केला. (Farmers angry as power supply to farm pump is cut off dhule news)

शिवाय शेती पंपासाठी वीज पुरवठा दिल्या जाणाऱ्या वेळेत सतत लपंडाव सुरू असल्याची तक्रार करण्यात आली.

ऐन हंगामात वीज पुरवठा खंडित

दरम्यान, रब्बी हंगाम काढणी आणि उन्हाळ कांदा लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तथापि सर्वच पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असताना वीज पुरवठा खंडित केला जात आहे. शेतकऱ्यांच्या‌ हातात तोंडाशी आलेला घास असताना वीज बिल थकल्याचे कारण सांगून रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बंद करून वीज पुरवठा खंडित केला जात आहे.

विजेच्या थकीत बिलापैकी किमान वीस टक्के वीज बिल भरल्या शिवाय रोहित्रे सुरू होणार नाहीत. असा इशारा कनिष्ठ अभियंता व वीज कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तसेच, वीज बिल भरलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला जात असल्याची माहिती वीज वितरण कंपनीच्या सूत्रांनी दिली.

शेतकऱ्यांसह पंचायत समितीचे माजी सदस्य राजधर देसले, लहू नेरे, शरद साळुंखे, श्रीराम नेरे, यशवंत नेरे, मच्छिंद्र नेरे, राजेंद्र नेरे, सूर्यभान शिरसाट, दिलीप देवरे, राजेंद्र देवरे उपस्थित होते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

कनिष्ठ अभियंत्यांशी चर्चा

येथील वीज उपकेंद्राचे कनिष्ठ अभियंता योगेश खैरनार यांच्याशी म्हसदीसह ककाणी, भडगाव, काळगाव, वसमार, चिंचखेडे येथील शेतकऱ्यांनी भेट घेत व्यथा मांडली. तूर्त दहा टक्के थकबाकी भरत उर्वरित दहा टक्के कांदा काढणीनंतर भरू असा विनंती शेतकऱ्यांनी केली.

कनिष्ठ अभियंता योगेश खैरनार यांनी वरिष्ठांशी बोलतो असे शेतकऱ्यांना सांगितले. शेती पंपासाठी कधी दिवसा तर कधी रात्री अशा फिरत्या नियोजनाप्रमाणे वीज पुरवठा केला जातो. निर्धारित वेळेतही अनेक वेळा पुरवठा खंडित होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी या वेळी केली.

पाच वर्षांपासून शेती पंप थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिल भरले नाहीत. त्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. सदर थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिल भरून महावितरणास सहकार्य करावे.

-योगेश खैरनार,

कनिष्ठ अभियंता,

वीज उपकेंद्र, म्हसदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT