yamini patil
yamini patil 
उत्तर महाराष्ट्र

VIDEO : शेतकरी बाप..कर्जाचा डोंगर..अन्‌ तिने संपविले जीवन 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : अतिपावसाने शेतीचे झालेले नुकसान, सोसायटीचे कर्जाचा बोजा, घरातील हलाखीची परिस्थिती..घर कसे चालवायचे; या विवंचनेत शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली; अशा घटना आतापर्यंत ऐकल्या आहेत. परंतु बापावर अगोदरच कर्जाचा डोंगर असल्याने आपल्या शिक्षणाची फी भरून आणखी बोजा कशाला वाढवायचा हि विवंचना आणि बाप जिवंत रहावा म्हणून सतरा वर्षीय मुलीनेच आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना भादली येथे घडली. 

शेतीसाठी कर्ज घेऊनही हाती काही आले नाही

भादली येथील सतरा वर्षीय यामिनी प्रमोद पाटील (वय 17) असे मृत शेतकऱ्याच्या मुलीचे नाव आहे. जळगाव येथील नंदिनीबाई महिला विद्यालयात बारावी विज्ञान शाखेत ती शिक्षण घेत होती. बारावीचे निम्मे वर्ष सरले असताना याच सहा महिन्याच्या काळात कॉलेज आणि क्‍लाससाठी पैसा लागला. अतिपावसामुळे शेतीतून उत्पन्न मिळत नाही. म्हणून आई- वडील मोलमजूरी करतात. हे सर्व चित्र यामिनीने पाहिले होते. शेतीसाठी कर्ज घेवूनही हाती काही आले नाही; या कर्जाखाली दबलेल्या बापाने काही वेगळे पाऊल नको उचलावे या विचारातून यामिनीने जीवनयात्रा संपविली. 

तिचे दु:ख दर्शविणारे दृश्य

क्‍लाससाठी आणखी पैसे कोठून आणायचे 
दोन अडीच बिघे शेती करूनही आई- वडील दोघेही रोजाने दुसऱ्याच्या शेतात राबत होते. अशातच हंगामात अतिरिक्त पाऊस झाला त्यात होत्याचे नव्हते झाले. विकास सोसायटीचे कर्जाचा बोजा, त्यात कुटुंबाचा आर्थिक गाडा ओढणे जिकरीचे जात असल्याचे चित्र यामिनीला दिसत होते. तिच्या कुटुंबीयांनी नुकताच क्‍लासची काही फी अदा केली, मात्र पुढच्या काळात महाविद्यालयाच्या फी व्यतिरिक्त विविध विषयांचे क्‍लासेससाठी लागणारी फी देणे अशक्‍यप्राय असल्याने यामिनी विवंचनेत अडकली होती. 

आई- वडील लग्न सोहळ्यात अन्‌... 
आज सकाळी आई-वडील दोघेही नात्यातील लग्न सोहळ्यासाठी भुसावळ येथे गेले होते. या दरम्यान दुपारी एकच्या सुमारास यामिनीने विष घेतले. दुपारी अडीचला आई- वडील घरी पोचले. आपण थायमेट घेतल्याचे यामिनीने सांगताच कुटुंबीयांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालय चौकीत एमएलसी नोंद होऊन नशिराबाद पोलिसांत या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामिनी पश्‍चात आई हेमलता, वडील प्रमोद आणि लहान भाऊ लोकेश असा परिवार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT