Farmers selling cotton. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News : पांढऱ्या सोन्याला चांगला भाव मिळावा; शेतकऱ्यांची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Agriculture News : तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाला पसंती देत खरिपाच्या हंगामात सुमारे आठ हजार ८०० हेक्टरवर कपाशीची लागवड केली होती. आता ठिकठिकाणी शेतात कापसाची बोंडे परिपक्व झाल्याचे दिसून येत असल्याने शेतकऱ्यांकडून कापूस वेचणीला सुरवात करण्यात आली आहे.

दरम्यान, पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला यंदा आठ ते दहा हजार प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी अपेक्षा कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.( Farmers expect good price for cotton nandurbar agriculture news)

तळोदा शहरातील व तालुक्यातील शेतकरी आता पारंपरिक पिकांसोबतच कमी कालावधीत चांगला मोबदला देणाऱ्या पिकांना पसंती देत आहेत. चांगला भाव तसेच हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून काही वर्षांपासून कापसाकडे बघण्यात येत आहे. तालुक्यात नगदी पीक म्हणून कपाशीकडे पाहिले जाते.

त्यामुळे तळोदा शहरासह तालुक्यातील प्रतापपूर, रांझणी, चिनोदा, बोरद, मोड यासह परिसरात मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड करण्यात आली. यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यात जवळपास आठ हजार ८०० हेक्टरवर शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली होती. दरम्यान, शेतकरी मोठे कष्ट घेऊन कापसाचे संगोपन करीत असतात.

तसेच कपाशीला लागवडीपासून ते काढणीपर्यंत मोठा खर्चही येतो. तसेच शेतकरी घाम गाळून कपाशीचे पीक जगवितात. मात्र ज्या वेळेस कापूस वेचणीस सुरवात होते त्याच वेळेस कापसाला योग्य भाव मिळत नाही, असा अनेक वर्षांपासूनचा शेतकऱ्यांच्या अनुभव आहे.

व्यापाऱ्यांकडून ओला कापूस असणे, कापूस काळा पडणे, तसेच कापूस गरम असणे अशी विविध कारणे देऊन कापसाची कवडीमोल खरेदी करण्यात येते. तसेच परिस्थितीमुळे शेतकरी बांधवदेखील व्यापारी जो भाव देतील त्याच भावात कापसाची विक्री करीत असतात.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असते. हे टाळण्यासाठी पांढरे सोने म्हणून समजल्या जाणाऱ्या कापसाला यंदा आठ ते दहा हजार प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी अपेक्षा तळोदा परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

''अनेक संकटांवर मात करीत मोठ्या प्रयत्नानंतर शेतकऱ्यांनी कापसाला जगवीत मोठे केले. आता कापूस वेचणीला सुरवात झाल्याने माझ्यासह परिसरातील शेतकरी सुखावला आहे. मात्र या वर्षी कापसाला चांगला भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे, जेणेकरून चांगला आर्थिक फायदा होईल.''-रामदास मराठे, कापूस उत्पादक शेतकरी, चिनोदा

''परिसरात कापूस वेचणी हंगाम सुरू आहे. मात्र कापूस काळा व गरम असल्याचे कारण सांगून व्यापारी कवडीमोल कापूस खरेदी करत आहेत. कापसाला आठ ते दहा हजार प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आहे.''-अरुण चव्हाण, कापूस उत्पादक शेतकरी, चिनोदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 'दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवा अन्यथा...'; लष्करप्रमुख जनरल द्विवेदींचा पाकिस्तानला इशारा

Ladki Bahin Yojana : e-KYC करताना OTP येत नसल्याची तक्रार, मंत्री आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती...

अग्रलेख : दहा तोंडी राजकारण..!

Easy Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा काहीतरी हटके! लिहून घ्या क्रिस्पी स्मॅश्ड पोटॅटो सॅलडची सोपी रेसिपी

आजचे राशिभविष्य - 04 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT